शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

तोडफोडप्रकरणी १८ अटकेत, वातावरण शांत

By admin | Updated: September 22, 2015 23:56 IST

श्री गणेश मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर मूर्ती बाहेर काढून विटंबना केल्याप्रकरणी सय्यदवाडीतील चार अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेण्यात

शिरगाव : चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली गावी नदीपात्रात श्री गणेश मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर मूर्ती बाहेर काढून विटंबना केल्याप्रकरणी सय्यदवाडीतील चार अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेचे तीव्र पडसाद अलोरे पंचक्रोशीत उमटले. त्यातून झालेल्या हिंसक घटनेत दंडाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाईनंतर अलोरे पंचक्रोशी मंगळवारी शांत झाली होती.सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता कुंभार्ली ग्रामस्थांनी गणेश विसर्जन केल्यानंतर सय्यदवाडीतील तरुणांनी मूर्ती बाहेर काढून बाजूला टाकल्याचे पाहिले. काहींनी त्याचे छायाचित्र काढले. हा प्रकार पंचक्रोशीत सगळीकडे समजताच या तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. एकीकडे पोलीस ठाण्यात ५०० हून अधिक ग्रामस्थांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली. जमावाचा आक्रमकपणा पाहून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी अधिक पोलीस कुमक मागवली व जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. तत्काळ फिर्याद दाखल केल्यावर आरोपींना अटक करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. सर्वपक्षीय नेतेमंडळींनी यावेळी वारंवार आवाहन करुनही जमाव शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हता. काही काळ रास्ता रोको तर काही वेळ घोषणाबाजी सुरुच राहिली. अखेर अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी या ठिकाणी भेट दिली. जमावातील प्रत्येकाचे नाव जाणून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. याचवेळी ताब्यात घेतलेल्या सय्यदवाडीतील अल्पवयीन तरुणांना चिपळूण पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यामध्ये सय्यदवाडीतील चार अल्पवयीन युवकांचा समावेश आहे. याबाबत संदेश विनायक कोलगे यांनी फिर्याद दाखल केली आहे. रात्री ९.३० नंतर विविध गावातून तरुण कार्यकर्ते दाखल झाले. दोन एसआरपी बटालियन असतानाही पोफळी नाका, कुंभार्ली, शिरगाव येथे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संतप्त जमावाने दोन एस. टी. बसेस व एक प्रशिक्षण वाहन यांच्या काचा फोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. याप्रकरणी कॉन्स्टेबल स्वप्नील साळवी यांच्या फिर्यादीनुसार दोन अल्पवयीन तरुणांसह अमिर यशवंत पवार (२२), सतीश श्रीराम सावंत (२४), सुजित प्रभाकर मेस्त्री (४२), किरण किशोर होडे (२२), राहुल दीपक राजेशिर्के (२२), नीलेश सखाराम सावंत (२९), विनायक यशवंत शिंदे (४७), समीर शांताराम खांबे (२८), राजेंद्र रघुनाथ खेतले (३९), शैलेश बबन चव्हाण (३२), प्रवीण प्रल्हाद खेतले (३१), महेश राजाराम सावंत (३४) यांना अटक करण्यात आली आहे.अद्याप ६० ते ७० जणांवर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अटक केलेल्या अल्पवयीन तरुणांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले. (वार्ताहर)शिरगाव पोलीस ठाण्यावर रात्री संतप्त जमावाने चाल केल्यावर परिस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ही घटना स्थानिक असल्याने आमदार सदानंद चव्हाण, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर शिंदे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे, पोफळीचे सरपंच चंद्रकांत सुवार, डॉ.शिवाजी मानकर, संदीप कोलगे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष मयुर खेतले व अन्य प्रतिष्ठीत ग्रामस्थ पोलीस ठाण्यात हजर होते. त्यांनी जमावाला समजविण्याचा प्रयत्न केला. आज (मंगळवारी) सकाळी ११ वाजता पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे, तहसीलदार वृषाली पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक घेतली. बैठकीत पोफळी, अलोरे पंचक्रोशीतील सरपंच, तंटामुक्त समिती अध्यक्ष, पोलीसपाटील अशा १२५ जणांनी हजेरी लावली. शिरगाव, अलोरे, पोफळी पंचक्रोशीत तणावपूर्ण शांतता पसरली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शासकीय यंत्रणा व पोलीस सतर्क आहेत. कुंभार्ली येथे घडलेली घटना या विभागातील पहिलीच घटना असल्याने व या भागात तीन गावात असलेला परस्पर सलोखा याचा विचार करता या प्रकरणाबाबत कमालीचा संयम पाळण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर या प्रकरणाला कोणताही रंग लागू नये, याची पुरेशी खबरदारी घेतली जात आहे.गणेशमूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी चार अल्पवयीन तरुणांना दिला जमावाने चोप. संतप्त जमावाची आरोपींच्या अटकेसाठी शिरगाव पोलीस ठाण्यावर धडक. रात्री उशिरापर्यंत जमाव गणपती बाप्पा मोरया... म्हणत पोलीस ठाण्याच्या आवारात. दोन एस. टी. बसेस व एका प्रशिक्षण वाहनाच्या तरुणांनी काचा फोडल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल. आज परिस्थिती नियंत्रणात असल्याने शांतता कमिटीची बैठक घेऊन बंदोबस्त केला शिथिल. ६ अल्पवयीन तरुणांना बालसुधारगृहात पाठविले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी केले प्रयत्न.