Ratnagiri: पावसाची उसंत तरी जगबुडी नदी इशारा पातळीवर, सर्वाधिक पावसाची नाेंद खेड तालुक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:53 IST2025-07-28T15:52:27+5:302025-07-28T15:53:08+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात गेले दाेन दिवस कधी मुसळधार तर कधी सरींवर काेसळणाऱ्या पावसाने रविवारी मात्र उसंत घेतली हाेती. जिल्ह्यात ...

Ratnagiri: पावसाची उसंत तरी जगबुडी नदी इशारा पातळीवर, सर्वाधिक पावसाची नाेंद खेड तालुक्यात
रत्नागिरी : जिल्ह्यात गेले दाेन दिवस कधी मुसळधार तर कधी सरींवर काेसळणाऱ्या पावसाने रविवारी मात्र उसंत घेतली हाेती. जिल्ह्यात सर्वत्र पावसाने उसंत घेतलेली असली, तरी रविवारी सकाळी खेड तालुक्यातील जगबुडी नदीचे पाणी इशारा पातळीच्या वर पाेहाेचले हाेते.
गेले दाेन दिवस जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली हाेती. मात्र, रविवारी सकाळी किरकाेळ सरी वगळता पावसाने विश्रांती घेतली हाेती. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. जिल्ह्यात रविवारी सकाळपर्यंत एकूण ४४७.१५ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे. तर सरासरी ४९.८८ मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. यामध्ये सर्वाधिक पावसाची नाेंद खेड तालुक्यात ७१.५७ मिलीमीटर इतकी तर सर्वात कमी पावसाची नाेंद गुहागरात २५.२० मिलीमीटर इतकी झाली आहे.
जिल्ह्यात रविवारी पावसाने विश्रांती घेतलेली असली, तरी खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली हाेती. सकाळी ही पाणीपातळी इशारा पातळीच्या वर ५.६० मीटरपर्यंत पाेहाेचली हाेती. या नदीची इशारा पातळी ५ मीटर आहे तर धाेका पातळी ७ मीटर आहे. सातारा, महाबळेश्वर या भागात पावसाचे प्रमाण वाढल्यास सह्याद्रीच्या डाेंगरकपारीतून वाहणारे पाणी जगबुडी नदीला येऊन मिळते. त्यामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ हाेते. दरम्यान, दुपारनंतर पाणीपातळी कमी हाेऊ लागली हाेती.