शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या ५६व्या वर्षी प्राप्त केली पदवी!

By admin | Updated: October 19, 2015 23:43 IST

सुनीता पवार : विवाहानंतरही शिक्षणाची तळमळ कायम

अमोल पवार --आबलोली शालेय जीवनात शिक्षणाची प्रचंड ओढ होती. मात्र, त्यावेळी शिक्षणाचं महत्व ग्रामीण भागात उमगलेलं नव्हते. घरची आर्थिक परिस्थितीही बेताचीच असल्याने इ. ७ वी नंतर शाळा सोडावी लागली. विवाहानंतर प्रपंचात अडकायला झालं. मात्र, शिक्षणाची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. आणि त्याच प्रचंड तळमळीतून वयाच्या ५६ व्या वर्षी पदवी प्राप्त करणाऱ्या गुहागर तालुक्यातील आबलोली पागडेवाडी येथील अंगणवाडी सेविका सुनीता महादेव पवार यांच्या दूर्दम्य महत्वाकांक्षेचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे.विवाहानंतर प्रपंच, मुलांचं संगोपन यात अडकून पडल्यामुळे काही काळ व्यस्ततेत गेला. मात्र, मुलं मोठी होत होती. शालेय शिक्षण सुरु झाले अशावेळी आबलोली खालील पागडेवाडी येथील स्थानिक ग्रामस्थांच्या पुढाकाराने बालवाडी १९९२ साली सुरु करण्यात आली आणि तेथे बालवाडीताई म्हणून त्या काम करु लागल्या. महिन्याकाठी ग्रामस्थ जेमतेम ८० ते १०० रुपये संकलीत करुन देत होते. मात्र, त्यातही समाधान मानून त्यांचे कामकाज सुरु होते. शिक्षण क्षेत्रात कार्यरत झाल्यावर आपल्या कमी शिक्षणाची खंत त्यांना वाटत होती. पुढील शिक्षण घेण्याची इच्छा होती. मात्र, योग्य मार्ग मिळत नव्हता. अशावेळी मोठ्या मुलाची दहावीची परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे सन १९९९ मध्ये १७ नं. फॉर्म भरुन बहिस्थ विद्यार्थी म्हणून त्यांनी दहावीची परीक्षा दिली. मोठ्या कालावधीनंतर शिक्षण घेताना दोन विषयात अपयश आले, पुन्हा निराशा पदरात पडली.सन २००० मध्ये बालवाडीचे रुपांतर अंगणवाडीत झाले आणि अंगणवाडी सेविका म्हणून त्या रुजू झाल्या. या ठिकाणीसुद्धा दहावी नापास असल्याने अन्य सेविकांच्या मानाने मानधन कमी मिळू लागले. फरक फक्त काही रुपयांचा होता. मात्र, वेदना मोठी होती. दरम्यान मोठा मुलगा शिक्षक, दुसरा कंपनीमध्ये इंजिनिअर, मुलगी पदवीधर होऊन संसारात रमली होती. पती आबलोली परिसरात माळीकाम करतात. त्याचवेळी आबलोली येथील डीटीएड कॉलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र सुरु झाले. त्यावेळी स्वयंप्रेरणेतून त्यांनी पूर्वतयारी अभ्यासक्रमास नाव नोंदवले. तेथे उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष कला शाखेत प्रवेश घेतला. त्यावेळी दोन विषयात एटीकेटी लागली. तरीसुद्धा हिंमत न हरता त्यांनी ते विषय चिपळूण केंद्रावर सोडवले. द्वितीय, तृतीय वर्ष कला शाखेतून यशस्वीपणे उत्तीर्ण केले. आणि वयाच्या ५६ व्या वर्षी पदवी संपादन केली.कोणत्याही बढतीसाठी नव्हे तर केवळ आपल्या समाधानासाठी उतार वयात शिक्षणासाठी आग्रही असणाऱ्या सुनीता पवार यांनी संगणक एमएस-सीआयटी परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली. त्यांची दूर्दम्य महत्वाकांक्षा आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.स्थानिक ग्रामस्थांच्या पुढाकाराने बालवाडीताई म्हणून केले काम.दहावी नापास असल्याने अंगणवाडी सेविका म्हणून मिळत होते कमी मानधन.आबलोलीत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र.प्रथम वर्ष कलाशाखेत घेतला प्रवेश.