लांजात कोरोना रुग्णांमध्ये घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:33 IST2021-07-27T04:33:33+5:302021-07-27T04:33:33+5:30

लांजा : तालुक्यात रविवारी कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याने चिंता वाढलेली असतानाच सोमवारी रुग्णांमध्ये घट झाली. एका दिवसामध्ये ८ नवीन ...

Decrease in coronary artery disease | लांजात कोरोना रुग्णांमध्ये घट

लांजात कोरोना रुग्णांमध्ये घट

लांजा : तालुक्यात रविवारी कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याने चिंता वाढलेली असतानाच सोमवारी रुग्णांमध्ये घट झाली. एका दिवसामध्ये ८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील कोरोना एकूण ३६७२ रुग्णसंख्या झाली असून, ३४६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या तालुक्यात ९३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

गेले चार दिवस तालुक्यातील कोरोना रुग्णांमध्ये हळूहळू घट होत असतानाच रविवारी रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली होती. सोमवारी करण्यात आलेल्या अँटिजन चाचणीचे २ तर आरटीपीसीआरचे ६ जण असे एकूण ८ पाॅझिटिव्ह आले आहेत. यामध्ये पनोरे-खालचीवाडी, देवधे-मालवाडी, वनगुळे खालचीवाडी, लांजा-कनावजेवाडी येथे प्रत्येकी एक, लांजा धावणेवाडी व कोंड्ये बौद्धवाडी येथे प्रत्येकी दाेन रुग्ण आढळले आहेत.

Web Title: Decrease in coronary artery disease