शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

पंढरपूरला निघालेल्या चिपळूणच्या तरुणांचा मृत्यू, एकजण गंभीर

By संदीप बांद्रे | Updated: July 16, 2024 20:52 IST

आषाढी एकादशीसाठी जाताना घडला अपघात

चिपळुण : आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला चिपळुणातून दुचाकीने निघालेल्या तरुणांचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सांगली जिल्ह्यातील आटपाडी - दिघंजी येथे घडली. या अपघातात तालुक्यातील पेढे मोरेवाडी येथील तरूणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला शहरातील पेठमाप गणेशवाडी येथील तरूण गंभीर जखमी झाला आहे. 

रवींद्र बाळू मोरे (४२, पेढे, मोरेवाडी, चिपळूण) असे अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तसेच त्याच्या सोबत असलेला सुधीर शांताराम निवाते (३०, पेठमाप, गणेशवाडी, चिपळूण) हाही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सांगली येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. रविंद्र मोरे आणि सुधीर निवाते हे दोघेही मित्र असून ते दरवर्षी पंढरपूर येथे आषाढी वारीला जात होते. यावर्षी त्यांनी आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी दुचाकीने पंढरपूरला जाण्याचा बेत केला. त्याप्रमाणे मंगळवारी सकाळी ८ वाजता ते दुचाकीने पंढरपुरला निघाले होते. पंढरपूर मार्गावरील आटपाडी तालुक्यातील दिघंजी येथून जात असताना कोणत्या तरी अज्ञात वाहनाच्या धडकेने भिषण अपघात झाला.

यामध्ये रविंद्र मोरे हा दुचाकीसह रस्त्याबाहेर फेकला गेला. त्याच्या डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाली. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच निवाते याच्या पायालाही गंभीर दुखापत झाल्याने त्याला तत्काळ सांगली येथील रूग्णालयात नेऊन उपचार सुरू केले आहेत. या अपघातात दुचाकीचे पुढील चाक निखळले असून मोठे नुकसान झाले आहे. यावरून या अपघाताची भिषणता लक्षात येते. 

या घटनेची माहिती मिळताच चिपळूणातील त्यांच्या नातेवाईकांनी सायंकाळी ४ वाजता सांगली येथे धाव घेतली. तसेच पंढरपूर येथे गेलेले काही वारकरी देखील घटनास्थळी पोहोचले. पेढे येथील रविंद्र मोरे हे सोनार व्यावसायीक असून पानगल्ली येथील खेराडे कॉप्लेक्स येथे त्यांचे दुकान आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. तसेच सुधीर निवाते यांचा बाजारपेठेत चहाचा व्यवसाय आहे.

टॅग्स :Accidentअपघात