Ratnagiri: दांडिया खेळताना बेशुद्ध पडलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 12:30 IST2024-10-14T12:29:55+5:302024-10-14T12:30:35+5:30

राजापूर (जि. रत्नागिरी ) : दांडिया खेळता-खेळता चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. वैष्णवी प्रकाश माने ...

Death of a student who fell unconscious while playing Dandiya | Ratnagiri: दांडिया खेळताना बेशुद्ध पडलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू

Ratnagiri: दांडिया खेळताना बेशुद्ध पडलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू

राजापूर (जि. रत्नागिरी) : दांडिया खेळता-खेळता चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. वैष्णवी प्रकाश माने (रा. आजिवली-मानेवाडी, राजापूर) असे तिचे नाव आहे. ही घटना गुरुवारी पाचल येथील सरस्वती विद्यामंदिर, कनिष्ठ महाविद्यालयात घडली.

पाचल येथील सरस्वती विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयात सरस्वतीपूजनाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यानिमित्ताने गरबा नृत्याचे आयाेजन केले हाेते. या गरब्यामध्ये वैष्णवी माने ही विद्यार्थिनी नाचत हाेती. नाचत असतानाच तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली. तेथील शिक्षकांनी तिला तत्काळ रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बेशुद्धावस्थेत असलेल्या या मुलीचा तत्काळ ईसीजी काढण्यात आला; मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

Web Title: Death of a student who fell unconscious while playing Dandiya