शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

देवरुख: कोसुंब येथे सापडलेला मृतदेह नांदळजच्या तरुणाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 4:51 PM

मुंबईला निघालेला निखिल चिरेखाणीकडे कसा आला, याची उकल झालेली नाही.

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब आडवा मारुती बसथांबानजीकच्या जुन्या चिरेखाणीमध्ये रविवारी अज्ञाताचा मृतदेह आढळला हाेता. या मृतदेहाची ओळख पटली असून, त्या तरुणाचे नाव निखिल प्रभाकर डोंगरे (२१) असे असून, तो नांदळज बोथलेवाडी येथे राहत होता. मात्र, या तरुणाच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.जुन्या चिरेखाणीत मृतदेह तरंगताना तेथील कामगारांना रविवारी दिसला हाेता. ही माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. राजू काकडे हेल्प अकॅडमीच्या कार्यकर्त्यांनी त्या चिरेखाणीत उतरून मृतदेह बाहेर काढला होता. हा तरुण सुमारे तीस वर्षाचा असल्याचा अंदाज देवरुख पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र, ओळख पटू शकली नव्हती. मृतदेहाचे विच्छेदन सोमवारी करण्यात आले. हा मृतदेह निखिलचा असल्याचे त्याची आई रोशनी डोंगरे आणि काका यांनी ओळखले. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. एस. पवार करीत आहेत.मुंबईला निघाला हाेतानिखिल हा बुधवारी ३ रोजी नांदळजहून मुंबईला जाण्यासाठी सायंकाळी साडेपाचच्या बसने कोसुंबकडे आला होता. बुधवारी नऊ वाजण्याच्या दरम्यान त्याने आईला कॉल करून मुंबईला रेल्वे कनेक्शन बसने कोसुंब स्टॉप वरून जात असल्याची माहिती दिली हाेती. मात्र, मुंबईला निघालेला निखिल चिरेखाणीकडे कसा आला, याची उकल झालेली नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी