Ratnagiri: समुद्राच्या उधाणामुळे नादुरुस्त नौका धडकल्या घरांना, किनाऱ्यावरील घरांचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:43 IST2025-06-28T13:42:59+5:302025-06-28T13:43:30+5:30

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Damage to houses due to damaged boats and coastal houses due to sea surge | Ratnagiri: समुद्राच्या उधाणामुळे नादुरुस्त नौका धडकल्या घरांना, किनाऱ्यावरील घरांचे नुकसान 

Ratnagiri: समुद्राच्या उधाणामुळे नादुरुस्त नौका धडकल्या घरांना, किनाऱ्यावरील घरांचे नुकसान 

दापोली : तालुक्यातील आंजर्ले खाडीकिनारी पडून असलेल्या नादुरुस्त नौका समुद्राच्या उधाणामुळे वाहून थेट वस्तीत शिरल्या. हा प्रकार बुधवारी किनाऱ्यावरील अडखळ येथे घडला. येथील इरफानिया जुईकर मोहल्ल्यातील वस्तीत या नाैका शिरल्या हाेत्या. यामुळे किनाऱ्यावरील घरांचे नुकसान झाले आहे.

गेले तीन दिवस समुद्राला उधाण आले असून, दापाेली तालुक्यातील किनारी भागात त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. बुधवारी समुद्राला आलेल्या उधाणामुळे आंजर्ले खाडी भागातील अडखळ येथे खाडीकिनारी नादुरुस्त असलेल्या नाैका वाहत इरफानिया जुईकर मोहल्ल्यातील लाेकवस्तीत धडकल्या हाेत्या. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले हाेते.

खाडीकिनारी अनेक वर्षांपासून भग्नावस्थेत पडलेल्या या नाैकांची विल्हेवाट न लावल्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या नाैका समुद्रउधाणामुळे लोकांच्या अंगणात, घरांमध्ये शिरल्याने आर्थिक हानी झाली आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून त्वरित आर्थिक मदत द्यावी, तसेच खाडीकिनारी पडलेल्या या भंगार नाैकांची विल्हेवाट लावावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Damage to houses due to damaged boats and coastal houses due to sea surge