Ratnagiri Crime: कौटुंबिक वादातून चुलत भावाचा खून, नांदगाव येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 12:07 IST2023-02-08T12:07:00+5:302023-02-08T12:07:22+5:30

डोक्यात लाकडी दांडका मारला, चुलत भावाचा जागीच मृत्यू झाला

Cousin killed due to family dispute, incident at Nandgaon Ratnagiri | Ratnagiri Crime: कौटुंबिक वादातून चुलत भावाचा खून, नांदगाव येथील घटना

Ratnagiri Crime: कौटुंबिक वादातून चुलत भावाचा खून, नांदगाव येथील घटना

चिपळूण : पूर्ववैमनस्यातून उफाळलेला वाद विकोपाला जाऊन एका तरुणाने आपल्याच चुलत भावाचा डोक्यात लाकडी दांडक्याने मारून खून केला. ही घटना तालुक्यातील नांदगाव-भुवडवाडी येथे सोमवारी (दि.६) घडली.

सुरेश केशव भुवड (४५, रा. नांदगाव-भुवडवाडी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी महेंद्र महादेव भुवड (४४, रा. नांदगाव-भुवडवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची फिर्याद अनंत राजाराम मोहिते (४५, रा. नांदगाव-भुवडवाडी) यांनी दिली आहे.

महेंद्र व सुरेश हे नात्याने चुलत भाऊ आहेत. या दोन्ही कुटुंबांमध्ये पूर्वीपासून वाद आहेत. सुरेश हा महेंद्रच्या आई-वडिलांना शिवीगाळ करीत असे. काही महिन्यांपूर्वी त्याने महेंद्रच्या वडिलांना मारहाणही केली होती. त्यांच्यातील वाद अनेकदा सावर्डे पोलिसातही गेला आहे.

सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेल्याने महेंद्रने सुरेश याच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने वार केले. यात सुरेश गंभीर जखमी होऊन जागीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सावर्डे पोलिस ठाण्याचे निरीक्षक भरत धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी महेंद्रला अटक केली आहे.

Web Title: Cousin killed due to family dispute, incident at Nandgaon Ratnagiri