दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न; पत्नी बचावली, पतीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 10:30 IST2019-08-12T10:26:58+5:302019-08-12T10:30:42+5:30

कर्जाला कंटाळून पती-पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. रत्नागिरी जवळच्या कुवारबाव येथे सोमवारी ही घटना घडली. यामध्ये पतीचा मृत्यू झाला असून पत्नी बचावली आहे. 

couple Attempted suicide in ratnagiri | दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न; पत्नी बचावली, पतीचा मृत्यू

दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न; पत्नी बचावली, पतीचा मृत्यू

ठळक मुद्देकर्जाला कंटाळून पती-पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.रत्नागिरी जवळच्या कुवारबाव येथे सोमवारी ही घटना घडली. यामध्ये पतीचा मृत्यू झाला असून पत्नी बचावली आहे. 

रत्नागिरी - कर्जाला कंटाळून पती-पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. रत्नागिरी जवळच्या कुवारबाव येथे सोमवारी (12 ऑगस्ट) सकाळी ही घटना घडली. यामध्ये पतीचा मृत्यू झाला असून पत्नी बचावली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक चव्हाण असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते एस. टी. महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.  मात्र त्याबाबत कामगार न्यायालयात प्रकरण सुरू आहे. कुवारबाव येथेच त्यांचे छोटेसे दुकान होते.  कर्जाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले. त्यांनी माने इंटरनॅशनल स्कूलजवळच्या विहिरीत उडी मारली. विहिरीला पाणी कमी होते. त्यात चव्हाण यांनी जीव गमावला. मात्र त्यांची पत्नी बचावली आहे. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी असून दोघेही विवाहित आहेत.
 

Web Title: couple Attempted suicide in ratnagiri