corona in ratnagiri-पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेतली रत्नागिरी आर्मीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 09:25 PM2020-04-11T21:25:39+5:302020-04-11T21:26:36+5:30

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात लोकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेणे ही सुद्धा एक सामाजिक जबाबदारी आहे. याच भावनेतून रत्नागिरी आर्मीने पुढाकार घेऊन रत्नागिरी शहर आणि परिसरातील विविध पोलीस स्थानके, चौक्या आणि रत्नागिरीतील विशेष कारागृह येथे जंतुनाशक फवारणी करण्यात केली.

corona in ratnagiri - Ratnagiri Army takes care of police health | corona in ratnagiri-पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेतली रत्नागिरी आर्मीने

corona in ratnagiri-पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेतली रत्नागिरी आर्मीने

googlenewsNext
ठळक मुद्देजनतेची काळजी घेणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेतली रत्नागिरी आर्मीने पोलीस स्थानके, चौक्यांसह विशेष कारागृहात केली जंतुनाशक फवारणी

रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात लोकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेणे ही सुद्धा एक सामाजिक जबाबदारी आहे. याच भावनेतून रत्नागिरी आर्मीने पुढाकार घेऊन रत्नागिरी शहर आणि परिसरातील विविध पोलीस स्थानके, चौक्या आणि रत्नागिरीतील विशेष कारागृह येथे जंतुनाशक फवारणी करण्यात केली.

सामाजिक भावनेतून काम करणारे अनेकजण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुढे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या रत्नगिरी आर्मीमध्ये एकत्रित झाले आहेत. आपल्या रत्नागिरीसाठी काम करणाऱ्या या सैनिकांनी फवारणीसाठी पुढाकार घेतला.

सर्वसामान्यांसाठी आपला जीव धोक्यत घालत असलेल्या पोलीस बांधवांच्या आरोग्याचीही काळजी आम्हाला आहे हाच संदेश यातून रत्नागिरी आर्मी ने दिला. यावेळी महेश गर्दे, डॉ. चंद्रशेखर निमकर, सिद्धांत शिंदे, निहार वैद्य, धीरज पाटकर, सचिन शिंदे आणि अन्य रत्नागिरी आर्मीच्या सैनिकांनी यामध्ये पुढाकार घेतला.

जिथे २४ तास पोलीस बंदोबस्त असतो अशा चौक्या त्यामध्ये परटवणे, शिरगाव, भाट्ये, लाला कॉम्प्प्लेक्स, जयस्तंभ, साळवी स्टॉप, मारुती मंदिर, कुवारबाव, शहर पोलीस स्थानक, वाहतूक शाखा, विशेष कारागृह या ठिकाणी ही फवारणी करण्यात आली. तसेच पोलीस व्हॅनमध्येही फवारणी करण्यात आली आहे.
 

Web Title: corona in ratnagiri - Ratnagiri Army takes care of police health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.