कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST2021-07-02T04:22:25+5:302021-07-02T04:22:25+5:30

२. चाचण्या वाढवूनही दररोज सापडणारे कोरोनाबाधित ५०० च्या दरम्यान असल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक ...

Corona patient | कोरोना रुग्ण

कोरोना रुग्ण

२. चाचण्या वाढवूनही दररोज सापडणारे कोरोनाबाधित ५०० च्या दरम्यान असल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक बाधित सापडणारी गावे, वाड्या उद्रेकजन्य म्हणून जाहीर करून ती कोरोना प्रतिबंधित क्षेत्र केली जात आहेत. रत्नागिरी तालुक्यात नऊगावे उद्रेकजन्य आहेत. कोरोनाने वाडीवस्तीवर हातपाय पसरविल्यामुळे तेथपर्यंत पोहोचून बाधितांना शोधण्याची मोहीम हाती घ्यावी लागत आहे.

३. कोरोना काळातही विविध सामाजिक उपक्रम राबवीत शासकीय हॉस्पिटल, संस्था, मंडळे आणि कुटुंबांना मदतीचा हात देणाऱ्या रोटरी क्लब, चिपळूणने शहरात कोरोनाबाबत जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील विविध ठिकाणी कोरोनासंदर्भात फलक बसविण्यात आले आहेत. कोरोनाचे रुग्ण अजूनही कमी होत नाहीत. लसीकरण प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाचा धोका अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Corona patient