शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

अधिकार्‍यांनी देयके थकविल्याने ठेकदाराची आत्महत्या

By admin | Updated: June 1, 2014 00:45 IST

मंडणगडमधील घटना, वातावरण तंग

मंडणगड : मंडणगड पंचायत समितीच्या अधिकार्‍यांनी देयके थकविल्याने बाजारातील देण्यांना कंटाळून पालघर येथील ठेकेदार नियाज पठाण (४५) यांनी आज शनिवारी सकाळी गावाशेजारील जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ९ वाजता ग्रामस्थांना नियाज पठाण यांचा मृतदेह आढळला. आत्महत्येपूर्वी पठाण यांनी लिहून ठेवलेल्या पत्राने पूर्ण तालुका हादरला आहे. त्यांनी अधिकार्‍यांची नावेच पत्रात नमूद केली असल्याने अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकारानंतर तालुक्यातील अनेकांनी पालघर येथे धाव घेतली. पोलिसांना पठाण यांच्या पार्थिवाशेजारी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली. पठाण यांची पालघर, विन्हे, देवांचा डोंगर व दापोली तालुक्यात शासकीय कामे सुरू होती. यातील बरीच कामे पन्नास ते शंभरटक्के पूर्ण होती. या कामापोटी त्यांना शासनाकडून सुमारे ७० लाख रूपये येणे बाकी होते़ येथील पंचायत समितीमधील पाणीपुरवठा विभागाचे अभियंता आनंदे, बांधकाम विभागाचे घस्ते यांच्याकडे ते वारंवार संपर्क साधून होते. या संदर्भात अधिकारी आनंदे याना २ लाख रूपये दिल्याचे व तरीही अधिकारी आपल्याला केवळ आश्वासने देत होते, असे त्यांनी चिठ्ठीमध्ये नमूद केले आहे. काही कामांची देयके तर तीन वर्षांपूर्वीची आहेत. या सार्‍यातून निराशा आल्याने दोनच दिवसापूर्वी त्यांनी आपली सद्यस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी रत्नागिरी येथे जाऊन माहिती घेतली होती. मात्र तेथेही त्यांना त्यांच्या फाईल सापडल्या नव्हत्या. केवळ आश्वासने मिळत होती तर बाजारातील देणेकर्‍यांची संख्या वाढत होती. या सार्‍या नैराश्येतून त्यांनी गळफास लावून घेतला. पोलिसांचा पंचनामा पूर्ण झाल्यानंतर पठाण यांचे यांचे पार्थिव मंडणगड येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. पठाण यांनी संबंधित अधिकार्‍यांची नावेच आपल्या पत्रात नमूद केली असल्याने त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या अधिकार्‍यांना ताबडतोब अटक करावी व त्यांचे निलंबन करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत याबाबत कोणतीही कारवाई करण्यात येत नाही तोपर्यंत शवविच्छेदन व दफनविधी न करण्याची भूमिका घेण्यात आली. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी दिघे, तहसीलदार कविता जाधव, पोलीस निरीक्षक हिंदुराव काटकर यांनी लोकांशी चर्चा केली व संबंधितांना अटक करण्याचे आश्वासन दिले. पोलीस कारवाईचा अहवाल आल्यानंतर निलंबनाबाबतची कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेकडून देण्यात आल्याने हे प्रकरण निवळले. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. मृत नियाजचे बंधू भाऊ फारख पठाण यांनी या प्रकरणी मंडणगड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. नियाज पठाण यांच्या पश्चात तीन, सात व आठ वर्षाच्या तीन मुली व आई असा परिवार आहे.