Ratnagiri Crime: चिपळुणात महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 17:34 IST2025-03-22T17:33:49+5:302025-03-22T17:34:25+5:30
चिपळूण : महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणीसोबत एका प्रौढाने अश्लील वर्तन केल्याची घटना शुक्रवारी दुपारी चिपळूण शहरात घडली. याप्रकरणी प्रौढावर चिपळूण ...

Ratnagiri Crime: चिपळुणात महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग
चिपळूण : महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणीसोबत एका प्रौढाने अश्लील वर्तन केल्याची घटना शुक्रवारी दुपारी चिपळूण शहरात घडली. याप्रकरणी प्रौढावर चिपळूण पोलिस स्थानकात सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिदवान मोहम्मद शफी शिरळकर (४०, रा. पेठमाप, चिपळूण) असे त्याचे नाव आहे.
याबाबतची फिर्याद पीडित तरुणीने दिली आहे. त्यानुसार पीडित तरुणी तिच्या मैत्रिणीसह महाविद्यालयात जात होती. त्यावेळी शिरळकर याने भर रस्त्यात त्या तरुणीशी अश्लील वर्तन केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्या ठिकाणच्या काही नागरिकांनी त्याला जाबही विचारला.
याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. पाेलिसांनी शिरळकर याला ताब्यात घेऊन पोलिस स्थानकात आणले. यावेळी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.