रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 09:43 PM2020-03-23T21:43:08+5:302020-03-23T21:48:20+5:30

जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात खाजगी प्रवासी वाहतुकीला निर्बंध घालण्यात आले आहेत.

Close all the boundaries of Ratnagiri district | रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद

रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद

Next
ठळक मुद्देप्रवासी वाहतुकीला निर्बंधमध्यरात्रीपासून अंमलबजावणीगर्दी न करण्याचे आवाहन

रत्नागिरी : कोरोना खबरदारीचा उपाय म्हणून अखेर २३ मार्च रोजी राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू झाली आहे याची अंमलबजावणी जिल्ह्यात काटेकोरपणे करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा अन्य जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात खाजगी प्रवासी वाहतुकीला निर्बंध घालण्यात आले आहेत.  

जिल्ह्यात यावर बंदी

  • सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास बंदी
  •  रेल्वे , खाजगी आणि एस्. टी. बसेस बंद
  •  खाजगी प्रवासी वाहतूक बंद
  •  सर्व प्रकारच्या प्रार्थना स्थळांवर भाविकांसाठी येण्यास बंदी मात्र पुजा अर्चना सुरू राहिल
  •  फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच बसेसचा वापर
  •  जीवनावश्यक वस्तू व सेवेतील दुकाने सोडून बाकी सर्व बंद
  •  जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भाजीपाला, औषधीसाठी दुकाने व वाहतूक सुरुच असेल
  •   शाळा, कॉलेजस, चित्रपटगृहे, सार्वजनिक कार्यक्रम बंद.


या सेवा राहतील सुरू 
शासकीय व निमशासकीय कार्यालये, सर्व बँका व पोस्टल कार्यालये,  दूरध्वनी व इंटरनेट कार्यालये, जीवनावश्यक साहित्य पुरवठा करणारे दुकान, विद्युत व पेट्रोलियम,  प्रसार माध्यमे,  ई - कॉमर्स सेवा देणारे उदा.फ्लीपकार्ट, अ‍ॅमेझॉन इ. अंत्यविधी (२५ व्यक्तीपुरते मर्यादीत). अत्यावश्यक कामासाठी लागणारी वाहने.

 




 

Web Title: Close all the boundaries of Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.