Ratnagiri: बांगलादेशींना कामावर ठेवणाऱ्या चिरेखाण मालकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 11:49 IST2025-01-04T11:48:46+5:302025-01-04T11:49:14+5:30
रत्नागिरी : तालुक्यातील नाखरे-कालकर काेंड येथील चिरेखाणीवर १३ बांगलादेशींना अनधिकृतपणे ठेवणाऱ्या पावस-भुसारवाडा येथील खाणमालकाला पूर्णगड पाेलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा ...

Ratnagiri: बांगलादेशींना कामावर ठेवणाऱ्या चिरेखाण मालकाला अटक
रत्नागिरी : तालुक्यातील नाखरे-कालकर काेंड येथील चिरेखाणीवर १३ बांगलादेशींना अनधिकृतपणे ठेवणाऱ्या पावस-भुसारवाडा येथील खाणमालकाला पूर्णगड पाेलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा अटक केली आहे. आसिफ कासम सावकार (५६), असे खाण मालकाचे नाव असून, विदेशी व्यक्ती अधिनियम १९६४ चे कलम ७ प्रमाणे अटक करण्यात आली आहे; मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आसिम सावकार यांनी जून २०२४ पासून ११ नाेव्हेंबर या कालावधीत नाखरे-कालकर काेंड येथील चिरेखाणीवर १३ बांगलादेशींना कामावर ठेवले हाेते. हे सर्व बांगलादेशी नागरिक घुसखाेरी करून भारतात आले हाेते. या घुसखोर कामगारांनी कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय, तसेच भारत बांगलादेश सीमेवरील मुलखी अधिकाऱ्याचे लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात अवैधरीत्या प्रवेश केला होता. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी या सर्व कामगारांना अटक केली होती.
या कारवाईनंतर खाण मालक आसिफ सावकार हे मुंबईत उपचारांसाठी गेले हाेते. त्यामुळे त्यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले हाेते. ते उपचार करून परत येताच गुरुवारी रात्री पूर्णगड सागरी पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांनी अटक केली. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले; मात्र वैद्यकीय कारणामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात आला असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यातील १३ बांगलादेशी कामगार सध्या न्यायालयीन काेठडीत आहेत.