शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणचे रस्ते होणार सिमेंटचे

By admin | Updated: June 21, 2014 00:10 IST

हिरवा कंदील : पालकमंत्र्यांसमवेत मुंबईत चर्चा

चिपळूण : दरवर्षी शहरातील मुख्य रस्त्यांवर दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा खर्च होतो. त्यासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनविण्याचा प्रस्ताव नगर प्रशासनाने तयार केला असून या प्रस्तावास राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. या रस्त्यांसंदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांच्या समवेत मुंबई येथे गुरुवारी बैठक झाली. त्यामुळे आता शहरातील मुख्य रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे होणार आहेत. अखिल भारतीय साहित्य संमेलन २०१३ मध्ये चिपळूण येथे झाले. या दरम्यान शहरातील मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. या डांबरीकरणासाठी लाखो रुपये खर्च झाला आहे. मात्र, रस्त्यावर होणारी वाहनांची वर्दळ व पडणारा पाऊस यामुळे काही महिन्यातच या रस्त्यांची पुन्हा दुरुस्ती करावी लागते. रस्ता समस्येवर कायमस्वरुपी तोडगा निघावा म्हणून शहरातील मुख्य ६ रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनविले जाणार आहेत. या रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून या संदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांच्या समवेत माजी आमदार रमेश कदम, नगराध्यक्ष रिहाना बिजले, मुख्याधिकारी प्रकाश पाटील, उपनगराध्यक्ष लियाकत शाह, नगरसेवक रुक्सार अलवी आदींसह अन्य नगरसेवकांनी मुंबई येथे बैठक घेवून रस्त्यांच्या कामाबाबत चर्चा केली. स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा होणार असून या रस्त्यास गटार दाखविण्यात आले नसल्यामुळे याबाबत पुन्हा नगरसेवकांची बैठक घेवून याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना करण्यात आली आहे. स्वामी मठ ते शिवाजी चौक, शिवाजी चौक ते पावर हाऊस, शिवाजी चौक ते मच्छीमार्केट, नाथ पै रंगोबा साबळे रोड, बाजारपूल ते गोवळकोट आदी रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील ५ रस्त्यांना पावसाळ्यानंतर सुरुवात होण्याची शक्यता असून सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांबरोबरच गटारेही चांगल्या पद्धतीने बांधली जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात अन्य कामांबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत. रस्त्यांसाठी मंजूर असणाऱ्या निधीतून प्रथम कामांना सुरुवात होणार आहे. डांबरी रस्ते दरवर्षी दुरुस्त करावे लागतात. यासाठी लाखो रुपये खर्च होतात. रस्त्यांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. त्यासाठी निधी मंजूर झाल्याने आता शहरातील मुख्य रस्ते सिमेंट काँक्रीटचे होणार आहेत.