पाली बाजारपेठेत चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:34 IST2021-08-19T04:34:24+5:302021-08-19T04:34:24+5:30

रत्नागिरी : तालुक्यातील पाली बाजारपेठेतील बिअर बारमध्ये इंडियन करन्सी पाहण्याच्या बहाण्याने पैशांच्या बंडलातील ३२ हजार रुपये हातचलाखीने काढून ...

Chari in Pali market | पाली बाजारपेठेत चाेरी

पाली बाजारपेठेत चाेरी

रत्नागिरी : तालुक्यातील पाली बाजारपेठेतील बिअर बारमध्ये इंडियन करन्सी पाहण्याच्या बहाण्याने पैशांच्या बंडलातील ३२ हजार रुपये हातचलाखीने काढून धूम ठोकणाऱ्या दोन संशयितांविरोधात ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार, १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली.

याबाबत सिद्धेश बाबूराव दूरकर (२९, रा. पाली बौध्दवाडी, रत्नागिरी) यांनी मंगळवारी दुपारी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार,सोमवारी सायंकाळी ते रत्नागिरी-कोल्हापूर रोडवरील पाली बाजारपेठेतील नीलेश बिअर शॉपी येथे होते. त्यावेळी दोन संशयितांनी इंडियन करन्सी पाहण्याच्या बहाण्याने दूरकर यांच्याकडील ७४ हजार रुपयांचे पैशांचे बंडल आपल्या हातात घेतले. त्यानंतर हातचलाखीने त्यातील ३२ हजार रुपये काढून तेथून पळून गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दूरकर यांनी ग्रामीण पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. अधिक तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल कांबळे करत आहेत.

Web Title: Chari in Pali market