चंद्रकांत सोगम यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:32 IST2021-04-22T04:32:10+5:302021-04-22T04:32:10+5:30

राजापूर : येथील नगर परिषदेतील सेवानिवृत्त मुख्य लिपिक व दिवटेवाडी येथील रहिवासी चंद्रकांत लक्ष्मण सोगम (७६) यांचे मंगळवारी सायंकाळी ...

Chandrakant Sogam passed away | चंद्रकांत सोगम यांचे निधन

चंद्रकांत सोगम यांचे निधन

राजापूर : येथील नगर परिषदेतील सेवानिवृत्त मुख्य लिपिक व दिवटेवाडी येथील रहिवासी चंद्रकांत लक्ष्मण सोगम (७६) यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर मेंदूविकाराचे उपचार सुरू होते. आठ दिवसांपूर्वी रत्नागिरी येथे शस्त्रक्रिया करून त्यांना घरी आणण्यात आले होते.

राजापूर नगर परिषदेत त्यांनी सुमारे २५ वर्षे मुख्य लिपिक म्हणून काम केले. मे २००४ मध्ये ते सेवानिवृत्त झाले होते. राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या उपाध्यक्षपदी त्यांनी काही काळ काम केले. याशिवाय, धूतपापेश्‍वर मंदिर जीर्णोद्धार समिती व ग्राहक पंचायत राजापूरचे ते सेक्रेटरी होते. युवक क्रीडा मंडळाचे ते सक्रिय सभासद होते. समर्थनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वार्षिक उत्सवासाठी निधी संकलनात दरवर्षी त्यांचे मोठे योगदान होते. सेवानिवृत्तीनंतरची १८ वर्षे त्यांनी अनेक सामाजिक कार्यांत हिरिरीने सहभाग घेतला होता.

मंगळवारी सायंकाळी त्यांची अचानक तब्येत खालावल्याने त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी उशिरा दिवटेवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलगे, एक विवाहित कन्या असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे तसेच नगर परिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्‍त केला आहे.

Web Title: Chandrakant Sogam passed away