शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

संगीत संशयकल्लोळ नाटकाची शताब्दी

By admin | Updated: October 13, 2016 23:51 IST

खल्वायन संस्थेतर्फे आयोजन : रत्नागिरीत २० आॅक्टोबरला संवाद, नाट्यप्रयोगाने रंगणार सोहळा

रत्नागिरी : सन १९९७पासून आजपर्यंत ५ नवीन संगीत नाटके व ६ जुन्या संगीत नाटकांची यशस्वी निर्मिती करणाऱ्या रत्नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्रात गेली १९ वर्षे सातत्यपूर्ण कार्य करणाऱ्या खल्वायन संस्थेतर्फे संगीत संशयकल्लोळ या नाटकाचा शताब्दीपूर्ती सोहळा रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा २० आॅक्टोबरला सायंकाळी ६ ते १० या वेळेत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात होणार आहे. २० आॅक्टोबर १९१६ रोजी सं. संशयकल्लोळ नाटकाचा प्रयोग गंधर्व नाटक मंडळींनी हुबळी-कर्नाटक येथे सादर केला. या पहिल्या प्रयोगात नटश्रेष्ठ गणपतराव बोडस, सदुभाऊ रानडे, दत्तोबा पेटकर, मास्टर कृष्णराव व रेवतीच्या भूमिकेत साक्षात बालगंधर्व असा नटसंच होता. बरोबर १०० वर्षांनी हे नाटक तितक्याच ताकदीने २० आॅक्टोबरला खल्वायन संस्थेचे कलाकार रत्नागिरी शहरातील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात सादर करणार आहेत. पहिल्या प्रयोगात सत्यनारायणाच्या प्रवेशात संगीत जलसा हा प्रसंग घेतला होता. या १००व्या नाटकाच्या वाढदिवसाप्रसंगी होणाऱ्या प्रयोगातसुद्धा हा जलशाचा खास प्रसंग घेतला जाणार आहे. या शताब्दीपूर्ती सोहळ्याला संगीत रंगभूमीवरील प्रदीर्घ काळ कार्यरत असलेले अरविंद पिळगावकर, जयंत सावरकर, मेधा गोगटे - जोगळेकर, भारती गोसावी हे प्रसिद्ध व ज्येष्ठ कलाकार उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरीच्या संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार अ‍ॅड. सुधाकर भावे हेही त्यांच्यासोबत असतील. आकाशवाणीच्या निवृत्त ज्येष्ठ निवेदिका निशा काळे व खल्वायनचे दिग्दर्शक प्रदीप तेंडुलकर या सर्व नट मंडळींशी वार्तालाप करणार आहेत. मनोहर जोशी यांनी दिग्दर्शन केलेल्या या नाटकात ते स्वत: मुख्य भूमिका करत आहेत. त्यांच्यासमवेत शमिका जोशी, श्वेता जोगळेकर, अजिंक्य पोंक्षे, आनंद प्रभुदेसाई, विजय जोशी, गणेश जोशी, मुक्ता जोशी, कौस्तुभ जोशी, प्राजक्ता जोशी, अर्चना जोशी, अभिजित भट, स्मिता करंदीकर हे रत्नागिरीतील कलाकार आहेत. नाटकाला संगीत मार्गदर्शन आनंद प्रभुदेसाई, नेपथ्य दादा लोगडे, सहाय्य अमित धांगडे, संजय लोगडे, किशोर नेवरेकर, सौरभ लोगडे, रंगभूषा दादा लोगडे, पार्श्वसंगीत व रंगभूषा सहाय्य रामदास मोरे, वेशभूषा श्रीनिवास जोशी, प्रकाशयोजना गोपिकांत भुवड, मंगेश लाकडे करतील. नाटकाचे सूत्रधार प्रदीप तेंडुलकर हे आहेत. आॅर्गनसाथ मधुसूदन लेले, तबलासाथ हेरंब जोगळेकर करतील. (प्रतिनिधी)