शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Ratnagiri: दापोलीतील सुवर्णदुर्ग रोप-वेला केंद्र सरकारचा हिरवा कंदील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 14:04 IST

दापाेली : केंद्र शासनाच्या पर्वतमाला याेजनेंतर्गत दापाेली तालुक्यातील गाेवा किल्ला ते सुवर्णदुर्ग किल्ला अशा राेप-वेला केंद्र सरकारने हिरवा कंदील ...

दापाेली : केंद्र शासनाच्या पर्वतमाला याेजनेंतर्गत दापाेली तालुक्यातील गाेवा किल्ला ते सुवर्णदुर्ग किल्ला अशा राेप-वेला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. या प्रकल्पासाठी सामाजिक कार्यकर्ते मिहीर दीपक महाजन यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला हाेता.मिहीर महाजन यांनी दिल्ली येथे २०२०च्या ऑक्टोबर महिन्यात मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन राेप-वेबाबत मागणी केली हाेती. त्यावेळी महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव करून आणा, मी हा रोप-वे करून देतो, अशी सूचना केली हाेती.मिहीर महाजन यांनी विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांचे सहकार्य घेतले. याबाबत राज्याचे तत्कालीन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेत या रोप-वेसाठी आग्रह धरला असता, त्यांनी पर्यटन विभागाला तसा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. तत्कालीन सांस्कृतिक विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत चर्चा केली. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रोप-वेची शिफारस करणारे पत्र दिले.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या १८ फेब्रुवारी राेजी झालेल्या बैठकीत या रोप-वेला हिरवा कंदील देण्यात आला आहे. केंद्र सरकारचे एनएचएलएम आणि महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग या रोप-वेचे काम कार्यान्वित करणार असल्याचा शासन निर्णय दि. १९ मार्च रोजी काढण्यात आला. त्यामुळे गाेवा किल्ला ते सुवर्णदुर्ग किल्ला असा राेप-वे हाेणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdapoli-acदापोलीFortगडCentral Governmentकेंद्र सरकार