Ratnagiri: चालकाचा ताबा सुटून कार दरीत कोसळली, चिरेखाण व्यावसायिकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 17:31 IST2025-03-22T17:30:44+5:302025-03-22T17:31:04+5:30

गुहागर : गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या बाजूला २० फूट खाेल दरीत काेसळून झालेल्या अपघातात चिरेखाण व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू ...

Businessman dies after car falls into ravine after driver loses control | Ratnagiri: चालकाचा ताबा सुटून कार दरीत कोसळली, चिरेखाण व्यावसायिकाचा मृत्यू

Ratnagiri: चालकाचा ताबा सुटून कार दरीत कोसळली, चिरेखाण व्यावसायिकाचा मृत्यू

गुहागर : गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या बाजूला २० फूट खाेल दरीत काेसळून झालेल्या अपघातात चिरेखाण व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अभय अरविंद ओक (५२, मूळ रा. वेळंब, सध्या रा. आबलोली, गुहागर) असे कारचालकाचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी काेतळूक येथे झाला.

अभय ओक यांचे चिरेखाण व्यवसायाबरोबर आबलोली येथे मेडिकल आहे. शुक्रवारी सकाळी ते बँकेचे काम करून आबलोलीवरून कोतळूक येथून कार (एमएच ०८ एपी ३७७७) ने घरी येत हाेते. कोतळूक कावणकरवाडी भागात ते आले असता त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर गाडी उजवीकडे रस्त्याखाली वीस फूट खाली दगडावर व झाडावर जाऊन आदळली. 

यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली हाेती. त्यांना तातडीने चिपळूण येथील डेरवण येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले हाेते. त्याठिकाणी उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व मुले आहेत.

Web Title: Businessman dies after car falls into ravine after driver loses control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.