शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

रत्नागिरी  जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये चोऱ्या करणारी टोळी गुन्हे अन्वेषणच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 2:33 PM

गर्दीचा फायदा घेत जिल्ह्यातील एस. टी. बसस्थानक परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून प्रवाशांच्या बॅग, पर्स चोरुन त्यातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरणारी ६ जणांची टोळी अखेर रत्नागिरी पोलीस गुन्हे अन्वेषण शाखेच्या जाळ्यात सापडली.

ठळक मुद्देरत्नागिरी  जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये चोऱ्या करणारी टोळी गुन्हे अन्वेषणच्या जाळ्यात६ जणांना अटक, साडेपाच लाखांचा ऐवज हस्तगत; ७ गुन्ह्यांची कबुली

रत्नागिरी : गर्दीचा फायदा घेत जिल्ह्यातील एस. टी. बसस्थानक परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून प्रवाशांच्या बॅग, पर्स चोरुन त्यातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरणारी ६ जणांची टोळी अखेर रत्नागिरी पोलीस गुन्हे अन्वेषण शाखेच्या जाळ्यात सापडली.

या ६ चोरट्यांच्या अटकेमुळे जिल्ह्यातील ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून स्कॉर्पिओ वाहनासह ५ लाख ५० हजार ४५१ रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.गेल्या सहा महिन्यांच्या काळात एस. टी. स्थानकांवर चोºयांचे प्रकार वाढल्याने त्याचा छडा लावण्याचा निर्धार जिल्हा पोलिसांनी केला होता. त्यानुसार तपासासाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांच्या नेतृत्त्वाखाली एक पथक तयार केले.

पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांच्यासह पोलीस कर्मचाºयांचे एक खास पथक तयार कले.या पथकाने दापोली, खेड, चिपळूण व देवरुख पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये घडलेल्या सर्व गुन्ह्यांचा आढावा घेऊन सीसीटीव्ही फुटेजचा व तांत्रिक बाबींचा बारकाईने अभ्यास केला.

फुटेजमधील संशयितांबाबत माहिती मिळवली असता ते वेळोवेळी रत्नागिरी, रायगड, नाशिक, सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर या ठिकाणी वावरत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यावरुन सदर पथकातील कर्मचारी यांची विभागणी करून त्यांना रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरात गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी पाठविले होते.८ डिसेंबर २०१८ रोजी काही संशयित (फुटेजच्या वर्णनातील) खेड परिसरात फिरत असल्याची बातमी मिळाली. त्यावरुन खेड परिसरातील एस. टी. स्टॅण्ड, रेल्वेस्टेशन, भरणेनाका या ठिकाणी शोध घेतला असता भरणेनाका या ठिकाणी संशयास्पदरित्या फिरताना स्कॉर्पिओ गाडी (एमएच - १६ - एटी ५११७) थांबविण्यात आली.

त्यामध्ये सीसीटीव्ही फूटेजमधील चोरटे आढळून आले. त्यांनी दापोली, खेड व चिपळूण एस. टी. स्टॅण्ड या ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांना ८ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी ४ वाजता अटक करण्यात आली.अटक करण्यात आलेल्या आरोपींंमध्ये सोमनाथ ज्ञानदेव गायकवाड (३८), ज्ञानदेव प्रभाकर बडे (३८), गणेश उर्फ संदीप दिनकर झिंझुर्डे (२६), आजीनाथ भगावन पवार (३२), नागेश बारकू पवार (२६), जगन्नाथ मुरलीधर वाघ (५०, सर्व रा. पाथर्डी, जि. अहमदनगर) यांचा समावेश आहे.

या चोरट्यांच्या अटकेमुळे दापोली पोलीस स्थानकाअंतर्गत ३, चिपळूण पोलीस स्थानकातील २, तर खेड पोलीस स्थानकातील २ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून स्कॉर्पिओ गाडीसह एकूण ५,५०,४५१ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. हे आरोपी सध्या चिपळूणमधील गुन्ह्यांच्या प्रकरणात अटक असून, त्यांना १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत उपनिरीक्षक सागर पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय कांबळे, राकेश बागुल, पोलीस नाईक विजय आंबेकर, सागर साळवी, सत्यजित दरेकर, चालक दत्ता कांबळे, रमीज शेख, दिनेश आखाडे, संदीप कोळंबेकर यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील कर्मचाºयांचा सहभाग होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसstate transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरी