शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

डिझेलटंचाईमुळे रत्नागिरीत बससेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 5:09 PM

दिपावलीच्या सुट्ट्या असल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी आगारासाठी लागणारा डिझेल टँकरसाठी सोमवार रात्री ऊशिरा मागणी करण्यात आली. मात्र तो येण्यापूर्वीच मंगळवारी सकाळी डिझेल संपल्यामुळे शहरी तसेच ग्रामीण एस. टी. सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. फेऱ्या अर्धा तास उशिराच्या फरकाने धावत होत्या. मात्र, दुपारनंतर स्थिती पुन्हा पूर्ववत झाली.

ठळक मुद्देडिझेलटंचाईमुळे रत्नागिरीत बससेवा विस्कळीतदुपारनंतर स्थिती पुन्हा पूर्ववत

रत्नागिरी : दिपावलीच्या सुट्ट्या असल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी आगारासाठी लागणारा डिझेल टँकरसाठी सोमवार रात्री ऊशिरा मागणी करण्यात आली. मात्र तो येण्यापूर्वीच मंगळवारी सकाळी डिझेल संपल्यामुळे शहरी तसेच ग्रामीण एस. टी. सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. फेऱ्या अर्धा तास उशिराच्या फरकाने धावत होत्या. मात्र, दुपारनंतर स्थिती पुन्हा पूर्ववत झाली.दिपावलीची सुट्टी दि. ५ ते १० नोव्हेंबर अखेर असल्याने दि.१२ रोजी कार्यालये पूर्ववत सुरू झाली. बँका बंद असल्यामुळे डिझेलसाठी लागणारी रक्कम सोमवारी बँकेत जमा करण्यात आल्यानंतर ऊशिरा टँकर मागणी करण्यात आली. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागीय कार्यशाळेत दररोज ५५ लाख रुपयांचे उत्पन्न जमा होते.दरमहा १८ ते २० कोटीची रक्कम असल्याने बँकेतर्फे वाहन पाठवून रक्कम रोजच्या रोज बँकेत जमा केली जाते.दुसरा व चौथा शनिवारी बँका बंद असताना रक्कम तर जमा होत असल्याने डिझेलसाठी लागणारी रक्कम वापरता येत नाही. त्यासाठीचे चलन तयार करता येत नाही.

शनिवार, रविवार जोडून सुट्टी आल्यानंतर सोमवारीच डिझेलसाठी पैसे वापरले जातात. डिझेलसाठीचे चलन तयार केल्यानंतरच कंपनीकडून टँकर पाठविले जातात. त्यामुळे सोमवारी डिझेलसाठीचे चलन भरल्यानंतर मंगळवारी दुपारी टँकराला परंतु सकाळीच डिझेल संपल्यामुळे राजापूर आगारातून डिझेल मागणविण्यात आले.

राजापूरातून डिझेल आणलेनंतर गाड्यांमध्ये भरण्यात आले. परंतु दरम्यानच्या काळात शहरी तसेच ग्रामीण भागातील फेऱ्यावर त्याचा परिणाम झाला. गाड्या ऊशिरा धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. रत्नागिरी बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती.

शहरी प्रवाशी संतप्तरत्नागिरी शहरी बसवाहतुकीवरही डिझेलटंचाईचा परिणाम झाला. अनेक फेऱ्या उशिरा सुटल्याने प्रवाशी संतप्त झाले होते. दुपारी १.१५ ते १.४५ यावेळेत केवळ कारवांचीवाडी ही एकच बस सोडण्यात आली. त्यामुळे मजगावकडे जाणाऱ्या प्रवाशांनी एकच हंगामा केला. काही नागरिकांनी कारवांचीवाडी बस थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहकाने याबाबत वाहतूक नियंत्रक कक्षाशी संपर्क साधण्यास सांगून बस पुढे जाऊ दिली. विशेष म्हणजे वाहतूक नियंत्रक कक्षात यादरम्यान कुणीच नव्हते

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरी