रत्नागिरी : पर्यटनासाठी कोकणात येणाऱ्या पर्यटकांना समुद्राचे आकर्षण अधिक असते. समुद्राच्या पाण्यात डुंबण्यासाठी उतरणाऱ्या पर्यटकांचीही संख्या वाढत आहे. मात्र, पर्यटक बुडण्याच्याही घटनांमध्ये वाढ होत आहे. या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेले जीवरक्षकच आता असुरक्षित झाले आहेत. जिल्हा परिषदेकडून त्यांचे वेतन बंद करण्यात आल्याने त्यांच्या वेतनाचा बोजा ग्रामपंचायतींवर पडला आहे. त्यामुळे आता जीवरक्षक ठेवण्याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे हे धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या इतर ठिकाणांपेक्षा अधिक आहे. पण तेथे पर्यटक बुडण्याच्या घटनादेखील अधिक आहेत. त्याचप्रमाणे गुहागर, दापोलीतील किनारेही प्रसिद्ध आहेत. रत्नागिरीतील आरे-वारे, भाट्ये हे समुद्रकिनारेही आता नावारूपाला आले आहेत. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना स्थानिकांकडून सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे दुर्घटना घडत आहेत. अनेकदा पर्यटकांच्या गाड्याही समुद्राच्या वाळूत रूतल्या जातात.पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी किनाऱ्यांवर ह्यवॉच टॉवरह्ण उभारले असून, तिथे जीवरक्षकांचीही नियुक्ती केली आहे. गणपतीपुळे येथे ११ जीवरक्षकांची नियुक्ती केली आहे. रत्नागिरीतील भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर दोन, गुहागर व दापोलीतही जीवरक्षकांची नियुक्ती केली आहे. नियुक्ती झाल्यानंतर दोन ते तीन वर्षे जिल्हा परिषदेकडून या जीवरक्षकांना प्रत्येकी ६ हजार रुपये वेतन देण्यात आले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेने हे वेतन देणे थांबविले आहे. उलट स्थानिक ग्रामपंचायतींशी पत्र व्यवहार करुन ग्रामपंचायतीमार्फत वेतन देण्यात यावे, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता या वेतनाचा भार ग्रामपंचायतींवर येऊन पडला आहे.विमा संरक्षण नाहीचभाट्ये ग्रामपंचायतीच्या दोन जीवरक्षकांना तर दि. १ मे २०१८ पासून ग्रामपंचायतच ६ हजार रुपये वेतन देत आहे. तर गणपतीपुळे येथील ११ जीवरक्षकांना फेब्रुवारी २०१९ पासून ग्रामपंचायतीने प्रत्येकी ६ हजार रुपये वेतन देणे सुरु केले आहे. मात्र, किनाऱ्यांवरील अन्य ग्रामपंचायतींना हे वेतन देणे अवघड बनले आहे. त्यातच जीवरक्षकांना विमा संरक्षण व अन्य काहीच गोष्टी दिल्या जात नाहीत. धोक्यात जीव घालून ते काम करत आहेत.
जीवरक्षकांच्या वेतनाचा बोजा ग्रामपंचायतींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 18:16 IST
पर्यटनासाठी कोकणात येणाऱ्या पर्यटकांना समुद्राचे आकर्षण अधिक असते. समुद्राच्या पाण्यात डुंबण्यासाठी उतरणाऱ्या पर्यटकांचीही संख्या वाढत आहे. मात्र, पर्यटक बुडण्याच्याही घटनांमध्ये वाढ होत आहे. या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेले जीवरक्षकच आता असुरक्षित झाले आहेत. जिल्हा परिषदेकडून त्यांचे वेतन बंद करण्यात आल्याने त्यांच्या वेतनाचा बोजा ग्रामपंचायतींवर पडला आहे. त्यामुळे आता जीवरक्षक ठेवण्याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जीवरक्षकांच्या वेतनाचा बोजा ग्रामपंचायतींवर
ठळक मुद्देजीवरक्षकांच्या वेतनाचा बोजा ग्रामपंचायतींवरविमा संरक्षण नाहीच