बहिणींना सोडायला निघालेल्या भावावर काळाचा घाला, अपघातात जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 11:45 IST2022-05-12T11:43:53+5:302022-05-12T11:45:58+5:30

पावस : बहिणींना बसस्थानकावर सोडण्यासाठी जात असताना दुचाकीची टेम्पोला धडक बसून झालेल्या अपघातात भावाचा जागीच मृत्यू झाला. दीपक परशुराम ...

Brother died on the spot in the accident in Pawas Ratnagiri | बहिणींना सोडायला निघालेल्या भावावर काळाचा घाला, अपघातात जागीच मृत्यू

बहिणींना सोडायला निघालेल्या भावावर काळाचा घाला, अपघातात जागीच मृत्यू

पावस : बहिणींना बसस्थानकावर सोडण्यासाठी जात असताना दुचाकीची टेम्पोला धडक बसून झालेल्या अपघातात भावाचा जागीच मृत्यू झाला. दीपक परशुराम जोशीलकर (१६, मूळ रा. बेळगाव, सध्या रा. कुर्धे - सडा, रत्नागिरी) असे दुचाकीस्वाराचे नाव असून, हा अपघातरत्नागिरी तालुक्यातील पावस येथील कुंभार घाटीत आज, गुरुवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमाराला झाला.

दीपक याचे कुटुंब सेंट्रींगच्या कामासाठी पावस येथे आले आहेत. वडील सकाळी कामावर निघून गेल्याने दीपक आपल्या बहिणी प्रियांका (२४) आणि राणी (२०) यांना सोडण्यासाठी दुचाकीवरुन पावस बसस्थानकावर निघाला होता. पावस येथील कुंभार घाटीत तो आला असता समोरून मॅक्झिमो टेम्पो आला आणि दुचाकी समोरुन जाऊन टेम्पोवर आदळली.

हा अपघात इतका भीषण होता की, दीपक याच्या डोक्याला जबरदस्त मार बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर प्रियांका व राणी या दोन बहिणींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर पावस दूरक्षेत्राच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.

Web Title: Brother died on the spot in the accident in Pawas Ratnagiri