खासदारांच्या पुतळ्याला भाजपने पाजले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 13:13 IST2021-02-15T12:57:22+5:302021-02-15T13:13:32+5:30

Bjp Ratnagiri- खासदार नारायण राणे आणि भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर खासदार विनायक राऊत आणि शिवसेनेकडून होणाऱ्या टीकेचा रविवारी रत्नागिरीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी खासदार राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला पाणी पाजून निषेध व्यक्त केला.

BJP pours water on MP's statue | खासदारांच्या पुतळ्याला भाजपने पाजले पाणी

खासदारांच्या पुतळ्याला भाजपने पाजले पाणी

ठळक मुद्देखासदारांच्या पुतळ्याला भाजपने पाजले पाणीविनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मारले जोडे

रत्नागिरी : खासदार नारायण राणे आणि भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर खासदार विनायक राऊत आणि शिवसेनेकडून होणाऱ्या टीकेचा रविवारी रत्नागिरीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी खासदार राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला पाणी पाजून निषेध व्यक्त केला.

यावेळी रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात रविवारी दुपारी भाजप कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी शिवसेनेच्या कृतीचा निषेध केला. शिवसेनेच्या कृतीला भाजपकडून जशास तसे उत्तर देत विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला पाणी पाजून जोडे मारले.

जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, पिंट्या निवळकर, अशोक वाडेकर, नंदू चव्हाण, मेहताब साखरकर, ययाती शिवलकर, रामा शेलटकर, अक्षय चाळके, अमर किर, शोएब खान, गुरुनाथ चव्हाण, सर्वेश सावंत, पप्पू सरफरे, इंतिखाब पठाण, भाई परपते, मन्सूर मुकादम, वल्लभ सरफरे, मनोज तांडेल, आशू सावंत, रमाकांत आयरे, साहिल पवार, विशाल पाटील, राजेश झगडे, शोभा जिरोळे, विद्या सुर्वे, सोनल चाळके, जयश्री भंडारी उपस्थित होते.

 

Web Title: BJP pours water on MP's statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.