बिहारी कामगाराचा गुहागरात महिलेवर बलात्कार ; संतप्त ग्रामस्थांचा तहसिलदारांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:25 PM2019-07-03T12:25:11+5:302019-07-03T12:29:11+5:30

५५ वर्षीय महिलेला तालुक्यातील डोडवली कोंडवी येथे शेतात एकटी काम करत असल्याचे पाहून एच एनर्जी कंपनीच्या पाईपलाईनसाठी असलेल्या मुळच्या मुझफ्फरनगर बिहार येथील टुनटुन कुमार नामक कर्मचाऱ्याने बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​​​​​​​

Bihari worker raped in Guhagar village; Enclosing the villagers of tehsildars | बिहारी कामगाराचा गुहागरात महिलेवर बलात्कार ; संतप्त ग्रामस्थांचा तहसिलदारांना घेराव

बिहारी कामगाराचा गुहागरात महिलेवर बलात्कार ; संतप्त ग्रामस्थांचा तहसिलदारांना घेराव

Next
ठळक मुद्देठार मारण्याचाही केला प्रयत्न महिन्याभरापूर्वी एक महिला बेपत्ता झाल्याचीही तक्रार

गुहागर : ५५ वर्षीय महिलेला तालुक्यातील डोडवली कोंडवी येथे शेतात एकटी काम करत असल्याचे पाहून एच एनर्जी कंपनीच्या पाईपलाईनसाठी असलेल्या मुळच्या मुझफ्फरनगर बिहार येथील टुनटुन कुमार नामक कर्मचाऱ्याने बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार डोडवली कांबळेवाडी येथील ५५ वर्षीय महिला एकटीच आपल्या शेतामध्ये सोमवारी सकाळी ९ वाजता काम करत होती. यावेळी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान पाईपलाईनचे काम करण्यासाठी आलेला टुनटुनकुमार हा तिच्याकडे वाईट नजरेने पहात होता व फिर्यादीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता.

यावेळी या महिलेने घाबरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आरोपी टुनटुन कुमार याने पाठलाग करुन गाठले व झाडीझुडपात पाहुन बलात्कार केला. यानंतर या महिलेच्या अंगावरील साडीनेच तोंड व गळ्याला गुंडाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला व हाताने मारहाण करुन बेशुद्ध झालेल्या या महिलेच्या अंगावर झाडी झुडपांच्या फांद्या तोडून टाकल्या, असे ग्रामस्थांनी सांगितले. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक शेलार व उपनिरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलीस करीत आहेत.



दुपारी घडलेल्या या घटनेची माहिती या महिलेने घरी जाऊन सांगितल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. रात्री उशीरा या महिलेला गुहागर रुग्णालय येथे आणले असता मोठ्या संख्येने ग्रामस्थ होते. सकाळी पुन्हा ग्रामस्थ व महिलांनी तहसील कार्यालय येथे येऊन तहसीलदार लता धोत्रे यांना घेराव घातला. एक महिन्यापूर्वी या गावातील महिला बेपत्ता आहे. अद्याप तिचा शोध लागलेला नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर येथील कामगारांशी याचा काही संबंध असू शकतो त्या दृष्टीने तपास झाला पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

कंपनी कंत्राटदार व कर्मचाऱ्यांची कसून चौकशी होऊन गुन्हेगार आढळल्यास तात्काळ गुन्हे दाखल करावेत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत या पाईपलाईनचे काम बंद ठेवावे, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असा सज्जड इशाराही ग्रामस्थांनी दिला.

प्रांताधिकारीच जबाबदार

गुहागरातील प्रांताधिकाऱ्यांनी जबरदस्तीने आमच्या जमिनी घेऊन या पाईपलाईनचे काम सुरु केले. आता आमची सुरक्षितताच धोक्यात आली असून याला प्रांताधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप डोडवलीतील ग्रामस्थांनी यावेळी बोलताना केला.

Web Title: Bihari worker raped in Guhagar village; Enclosing the villagers of tehsildars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.