पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपले! अक्रमकडून पाकिस्तानी खेळाडूंचा 'करेक्ट कार्यक्रम'

T20 World Cup 2024 USA vs IRE : पाकिस्तान ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मधून बाहेर झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 11:57 AM2024-06-15T11:57:42+5:302024-06-15T12:06:22+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup 2024 USA vs IRE Wasim Akram criticizes Pakistan team  | पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपले! अक्रमकडून पाकिस्तानी खेळाडूंचा 'करेक्ट कार्यक्रम'

पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपले! अक्रमकडून पाकिस्तानी खेळाडूंचा 'करेक्ट कार्यक्रम'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Wasim Akram On Pakistan Team : भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मधून बाहेर झाला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वातील संघाने तीनपैकी केवळ एक सामना जिंकला आहे. त्यामुळे रविवारी होणारा पाकिस्तान-आयर्लंड हा सामना म्हणजे केवळ औपचारिकता असेल. पावसाने पाकिस्तानला बुडवल्याने शेजाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून पाकिस्तान संघाचे पॅकअप निश्चित झाले. अमेरिका आणि भारताविरुद्धचा पराभव त्यांच्यासाठी घात करणारा ठरला. अ गटातून भारताने सुपर ८ चे तिकिट पक्के केले होते आणि दुसऱ्या स्थानासाठी अमेरिका आघाडीवर होते. अमेरिका विरुद्ध आयर्लंड लढतीवर पाकिस्तानचे नशीब अवलंबून होते, परंतु त्यांना ती साथ मिळाली नाही. हा सामना पावसामुळे रद्द झाल्याने अमेरिका व आयर्लंडला प्रत्येकी १-१ गुण मिळाला आणि यजमानांनी ५ गुणांसह सुपर ८ मधील आपली जागा पक्की केली.

पाकिस्तान स्पर्धेबाहेर होताच शेजारील देशातील माजी खेळाडू आपल्या संघाला घरचा आहेर देत आहेत. अशातच पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने पाकिस्तानी खेळाडूंची फिरकी घेतली. तो म्हणाला की, अमेरिकेच्या संघाचे अभिनंदन. अमेरिकेचा संघ सुपर-८ साठी पात्र ठरला आहे. ते तिथे जाण्यासाठी ते नक्कीच पात्र आहेत. त्यांनी साखळी फेरीत पाकिस्तानला पराभूत केले होते. म्हणूनच आज अमेरिकेचा संघ सुपर-८ साठी पात्र ठरला आहे. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंनी आता दुबईला जावे आणि तिथून नंतर आपापल्या संबंधित शहरांकडे कूच करावी. मग आपण पाहूया पुढे काय होते ते. अक्रमने 'आयसीसी'ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बोलताना पाकिस्तानी संघावर टीकास्त्र सोडले. 

दरम्यान, पावसामुळे अमेरिका-आयर्लंड सामना उशीरा सुरू झाला. १० वाजेपर्यंत खेळपट्टीची पाहणीच सुरू होती आणि रेफरींनी ११.४६ वाजता मॅच सुरू होणार असल्याचे जाहीर केले. पावसामुळे विलंब झाल्याने ही लढत ५-५ षटकांची खेळवण्यात येणार होती. ११ वाजता खेळपट्टीची पाहणी करताना काही मैदानावरील काही ओल्या पृष्ठभागावर सामनाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तितक्यात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार झाले आणि वीजांचा कडकडाटही झाला. त्यामुळे पुन्हा खेळपट्टी झाकण्यात आली. सामनाधिकारी जवागल श्रीनाथने सामना रद्द झाल्याचे जाहीर केले आणि पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम झाला. 

Web Title: T20 World Cup 2024 USA vs IRE Wasim Akram criticizes Pakistan team 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.