शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोठी बातमी! खेड तालुक्यात दरड कोसळली; 17 जणांसह ढिगाऱ्याखाली गाडली गेली 25 जनावरं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 13:24 IST

तब्बल 12 घरांना याचा फटका बसला आहे. यातील 6 घरे पूर्णपणे पडली आहेत. त्यात 17 जण गाडले गेलाची शक्यता आहे. याच बरोबर 25 जनावरेही दरडीखाली गाडली गेली आहेत.

खेड - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. यातच आज (शुक्रवार) यथील धामणंदनजीकच्या पोसरे बौद्धवाडीत शुक्रवारी दरड कोसळून 17 जण त्याखाली गाडले गेले असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

खेड तालुक्यात गेला आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने बुधवारी रात्रीपासून जोर धरला आहे. या मुसळधार पावसामुळे पोसरे येथील बौद्धवाडीवर दरड कोसळली. तब्बल 12 घरांना याचा फटका बसला आहे. यातील 6 घरे पूर्णपणे पडली आहेत. त्यात 17 जण गाडले गेलाची शक्यता आहे. याच बरोबर 25 जनावरेही दरडीखाली गाडली गेली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

Maharashtra Rain Live Updates : महाडच्या तळई गावात दरड कोसळून 22 जणांचा मृत्यू

खेड तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे गुरुवारी जगबुडी आणि नारिंगी नद्यांना पूर आला होता. यामुळे नदी काठच्या गावांत मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले होते. एवढेच नाही, तर खेड बाजारपेठही पाण्याखाली गेली होती. सतस सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण तालुक्यातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे.

रायगडमधील तळई गावात दरड कोसळली 32 जणांचा मृत्यू -मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळच्या सुमारास रायगडमधील तळई गावातही दरड कोसळली. यात गावातील सुमारे ३५ घरे गाडली आहेत. मुसळधार पावसामुळे या दुर्घटनास्थळावर मदत पोहोचवणे शक्य झाले नाही. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनीच मदतकार्य सुरू करून येथील गाडल्या गेलेल्या घरांमधून तब्बल 32 मृतदेह बाहेर काढले आहेत. तर अद्यापही 80 ते 90 मृतदेह ढिगाऱ्याखाली दबले गेले असल्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.  

Ratnagiri Flood: धडकी भरवणारा पाण्याचा वेढा; एअर फोर्सने आकाशातून काढलेले रत्नागिरी पुराचे फोटो

दरड कोसळून 4 लोकांचा मृत्यू -

पोलादपूर - साखर सुतार वाडी येथे दरड कोसळून 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अजून 5 लोक ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. 4 लोक जखमी आहेत. या गावांना जोडणारे पितळवाडी- उमरठ फाटा पूल तसेच उमरठ फाटा ते साखर पूल देखील वाहून गेल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस