'...तेव्हा भास्कर जाधवही बॅग भरून तयार होते'; योगेश कदम यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 13:17 IST2024-03-09T12:59:56+5:302024-03-09T13:17:21+5:30

लोकसभा निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे.

Bhaskar Jadhav was also packed and ready when we were in Guwahati'; Yogesh Kadam's secret explosion | '...तेव्हा भास्कर जाधवही बॅग भरून तयार होते'; योगेश कदम यांचा गौप्यस्फोट

'...तेव्हा भास्कर जाधवही बॅग भरून तयार होते'; योगेश कदम यांचा गौप्यस्फोट

आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या लोकसभा निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. तसेच, कोकणात होळी सणाच्या आधीच राजकीय शिमगा रंगताना दिसत आहे. 

शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी मोठा दावा केला आहे. आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हाच भास्कर जाधव देखील बॅग भरून तयार होते, असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे. ही गोष्ट एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि मला माहिती आहे. तेव्हा एकनाथ शिंदेंनी आम्हाला दोघांना बाजूला घेऊन विचारले होते की काय करायचे?, भास्कर जाधव देखील यायला तयार आहेत. तेव्हा भास्कर जाधव यांच्यासारखी व्यक्ती आपल्यासोबत नको ही भूमिका आम्ही मांडली होती, असं योगेश कदम यांनी सांगितले. 

स्वतःचे कसे खरे आहे हे रेटून न्यायचे आणि पक्षांतर्गत वाद निर्माण करायचे या व्यतिरिक्त भास्कर जाधव यांना काही येत नाही, अशी टीका योगेश कदम यांनी केली. मविआ मध्ये असताना दापोली मतदारसंघ हा विकास कामांच्या बाबतीत मागे जात होता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्व विकासकामांना गती मिळाली. महात्त्वाच्या विकास कामांचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन होत आहे, असं योगेश कमद यावेळी म्हणाले. 

Web Title: Bhaskar Jadhav was also packed and ready when we were in Guwahati'; Yogesh Kadam's secret explosion