शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
3
स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?
4
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
5
"भाई, ती मुलगी नाही...एक पंजा अन्...!"; थेट वाघोसोबतच 'लिप लॉक' करताना दिसला तरुण, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
6
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका
7
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
8
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
9
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
10
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
11
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
12
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
13
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
14
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
15
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
16
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
17
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
18
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
19
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
20
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन

रत्नागिरीत बेकायदेशीर वास्तव्य, बांगलादेशी महिलेला कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 16:43 IST

रत्नागिरी : व्हिसाचा कालावधी संपूनही रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य तसेच बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या बांगलादेशी महिलेला ...

रत्नागिरी : व्हिसाचा कालावधी संपूनही रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य तसेच बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या बांगलादेशी महिलेला न्यायालयाने सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या महिलेला १७ जानेवारी २०२०५ रोजी दहशतवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात आली होती.सलमा खातून बिलाल मुल्ला ऊर्फ सलमा राहिल भोंबल (३०, रा. सफा टॉवर्स बिल्डिंग, साळवी स्टॉप, रत्नागिरी) असे या महिलेचे नाव आहे. या महिलेविरोधात शहर पोलिस स्थानकात भारतीय न्यायसंहिता १९५० चा नियम ३ (ए), ६ (ए) विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६चे कलम १४ (अ) व कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी बुधवारी मुख्य न्याय दंडाधिकारी गोसावी यांनी आरोपी महिलेला ६ महिने साधा कारावास व पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास १ दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.या खटल्यात शहर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक शीतल पाटील यांनी काम पाहिले. तर पैरवी अंमलदार म्हणून महिला हवालदार साळवी व पाटील यांनी काम पाहिले.

९० दिवसांचा व्हिसा घेऊन भारतात

  • सलमा ही १६ डिसेंबर २०१६ रोजी ९० दिवसांचा व्हिसा घेऊन भारतात आली होती. यावेळी तिचे वास्तव्य गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे होते. यानंतर तिने राहिल भोंबल याच्याशी विवाह केला.
  • व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ती २०१७ ते २०२५ या कालावधीत अवैधरीत्या भारतात राहत हाेती. या काळात सलमा तिने आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मदाखला आदी बनावट कागदपत्रे तयार करीत भारतात वास्तव्य केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBangladeshबांगलादेशWomenमहिलाCourtन्यायालयPoliceपोलिस