शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

अझोलाने दिला शेतकऱ्याला आधार

By admin | Updated: January 14, 2015 23:35 IST

दुग्धोत्पादनात वाढ : प्रजनन क्षमताही वाढत असल्याने ठरतेय लाभदायी

मेहरुन नाकाडे -रत्नागिरी -दुग्ध उत्पादक जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांना चाऱ्याची समस्या नियमित भेडसावत असते. नागरी वस्तीमध्ये होत असलेल्या वाढीमुळे जनावरांना चरवण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. शिवाय नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावत असताना, ‘अझोला’ उत्पादन शेतकऱ्यांना पूरक ठरत आहे. दूध देणाऱ्या जनावरांची प्रजनन क्षमता वाढते, शिवाय दुधामध्ये वाढ होत आहे. ‘अझोला’ पर्णवर्णीय पाण्यात वाढणारी वनस्पती आहे. २५ ते ३५ टक्के प्रोटीन, १० ते १५ टक्के खनिजे, अमिनो आम्ल तसेच ७ ते १० टक्के जैव सक्रिय पदार्थ व जैव बहुलक आहे. गाई, म्हशींना दररोजच्या खाद्याबरोबर ‘अझोला’ देण्यात आला असता, दुधामध्ये २५ ते ३० टक्के वाढ झालेली दिसून येते.‘अझोला’ उत्पादन परसदारात घेण्यात येऊ शकते. एक मीटर रूंद व तीन मीटर लांबीचा खड्डा काढून, त्यामध्ये तितक्याच लांबी रूंदीचे सीलपॉलीन कापड आच्छादले जाते. त्यामध्ये तीन घमेली माती, अर्धा घमेले शेण, तसेच अर्धा किलो गांडूळ खत व सुपर फॉस्पेट घातले जाते. त्यामध्ये पावकिलो अझोला घालण्यात येतो. शिवाय ताजे पाणी घालण्यात येते. या संपूर्ण बेडमध्ये ‘अझोला’ तयार होण्यासाठी ७ दिवस लागतात. अशा प्रकारचे सात बेड तयार केले असता शेतकऱ्यांना दररोज ‘अझोला’ उत्पादन मिळते. जेणेकरून त्याचा उपयोग दुग्ध उत्पादनामध्ये होणारी वाढ व जनावराच्या वाढीव प्रजनन क्षमतेवरून दिसून येतो. ‘अझोला’ हार्बल असल्याने जनावरांना दुग्ध वाढीसाठी गोळ्या किंवा पावडर वापरावी लागत नाही. याचा खर्च वाचतोच, शिवाय जनावरांसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचे दुष्परिणाम होत नाहीत.‘अझोला’चा वापर कुक्कट खाद्यातही करण्यात येतो. ‘अझोला’मिश्रीत खाद्यामुळे कोंबडीच्या अंडी देण्याच्या क्षमतेतही वाढ होताना दिसते.आत्मा व कृषी अधिकारी कार्यालयातर्फे कन्याकुमारी येथे अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. चैतन्य शेतकरी स्वयंसहाय्यता बचत गटाच्या शेतकऱ्यांनी चार दिवस विवेकानंदपूरम् येथे राहून माहिती घेतली. तामिळनाडू विद्यापीठाचे मि. पिलई व जी. वासुदेवन् यांनी मार्गदर्शन केले. सध्या १२ ते १५ शेतकऱ्यांनी हे उत्पादन सुरू केले आहे. अझोलाचा एक बेड पाच वर्र्षे चालतो. - प्रसन्न दामले, शेतकरी, शिरगाव.