शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी ६.१० मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कडक उन्हाळा सुरू असून, त्याचा परिणाम भूगर्भातील भूजल पातळीवर झाला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस भूजल ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कडक उन्हाळा सुरू असून, त्याचा परिणाम भूगर्भातील भूजल पातळीवर झाला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस भूजल विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, मागील पाच वर्षांच्या सरासरीनुसार पाण्याच्या पातळीत किरकोळ घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याची भूजल सरासरी पातळी ०.१४ मीटर इतकी आहे.

यंदा मोसमी पाऊस उशिरापर्यंत राहिल्यामुळे गतवर्षीपेक्षा पाणीटंचाईची तीव्रता कमी राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच यंदा जिल्ह्यात पाण्याचा टँकर उशिरा धावला. तसेच अजूनही पाणीटंचाईग्रस्तांची संख्या गतवर्षीपेक्षा कमी आहे. भूजल पातळीसह मे महिन्यापर्यंत टंचाईची स्थिती काय राहील, याचा अंदाज घेण्यासाठी भूजल विभागाकडून २०२१ मार्चच्या अखेरीस सर्वेक्षण करण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

या अहवालानुसार मागील ५ वर्षातील सरासरी आकडेवारी ०.१४ मीटरने वाढली आहे. मार्च २०२१ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील सरासरी पातळी ६.१० मीटर आहे. भूजल पातळी व्यवस्थित असल्याने टंचाईची तीव्रता यंदा कमी राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार टँकरची गरज भासू शकते.

भूजल पातळीची स्थिती चांगली असल्याने यंदा जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा टंचाईग्रस्त गावे, वाड्यांची संख्या कमी आहे. जिल्ह्यात सध्या १२ गावांतील १४ वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरू आहे. या टंचाईग्रस्तांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षापेक्षा यंदाची पाणीटंचाई निम्मी आहे.