ऑस्ट्रेलियन पर्यटकांना रायगड जिल्ह्यात अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 18:38 IST2020-01-08T18:36:36+5:302020-01-08T18:38:04+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर , गणपतीपुळे , मालवण, गोवा पर्यटनासाठी रिक्षातून निघालेल्या ऑस्ट्रेलियन पर्यटकांना रायगड जिल्ह्यातील अम्बेत घाटात अपघात झाला. चालकाचा रिक्षावरिल ताबा सुटल्याने तिन ऑस्ट्रेलियन पर्यटकांना दुखापत झाली आहे.

ऑस्ट्रेलियन पर्यटकांना रायगड जिल्ह्यात अपघात
रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोली, गुहागर , गणपतीपुळे , मालवण, गोवा पर्यटनासाठी रिक्षातून निघालेल्या ऑस्ट्रेलियन पर्यटकांना रायगड जिल्ह्यातील अम्बेत घाटात अपघात झाला. चालकाचा रिक्षावरिल ताबा सुटल्याने तिन ऑस्ट्रेलियन पर्यटकांना दुखापत झाली आहे.
या रिक्षात ऑस्ट्रेलिया मधून आलेले पर्यटक प्रवास करत असताना हा अपघात घडला. घाटाच्या वळणदार रस्त्यावर चालकाचा रिक्षावरिल ताबा सुटल्याने अपघात घडल्याची माहिती मिळाली.
या रिक्षात बसलेल्या तिन ऑस्ट्रेलियन पर्यटकांना दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले आहे. यातील तीन रिक्षा व काही पर्यटक रिक्षातून दापोली मार्गे गुहागर, गणपतीपुळेकडे निघाले आहेत.