चिपळुणात तरुणावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:36 IST2021-08-24T04:36:07+5:302021-08-24T04:36:07+5:30

चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाक्याकडून खेर्डीकडे पायी जाणाऱ्या तरुणावर खेर्डी त्रिमूर्ती हॉटेल येथे एका अनोळखी व्यक्तीने प्राणघातक हल्ला केल्याची ...

Assault on a young man in Chiplun | चिपळुणात तरुणावर प्राणघातक हल्ला

चिपळुणात तरुणावर प्राणघातक हल्ला

चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाक्याकडून खेर्डीकडे पायी जाणाऱ्या तरुणावर खेर्डी त्रिमूर्ती हॉटेल येथे एका अनोळखी व्यक्तीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी १२.१५ वाजता घडली. या हल्ल्यात प्रीतम सदानंद शिंदे (२८, रा. सती समर्थनगर, चिपळूण) हा तरुण जखमी झाला असून या प्रकरणी पोलिसांनी त्या अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी प्रीतम सदानंद शिंदे याने फिर्याद दिली आहे. ताे शहरातील बहादुरशेख नाका ते खेर्डी रस्त्याने घरी चालत जात होता. तो खेर्डी परिसरात आला असता त्रिमूर्ती हॉटेलच्या पायरीवर बसलेल्या एका अनोळखी व्यक्तीने प्रीतमच्या उजव्या हातावर व उजव्या बाजूच्या पोटाखाली हत्याराने हल्ला केला. यात प्रीतम जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या अनोळखी व्यक्तीचा पाेलीस शाेध घेत असून, अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद आंबेरकर करत आहेत.

Web Title: Assault on a young man in Chiplun