महिलेवर प्राणघातक हल्ला करून हल्लेखोराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 18:02 IST2019-10-14T17:56:51+5:302019-10-14T18:02:18+5:30
आपल्या कार्यालयातील सहकारी महिलेवर प्राणघातक हल्ला करून त्या महिलेच्याच घरात हल्लेखोराने आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी रत्नागिरी शहरातील बंदर रोड येथे घडली.

महिलेवर प्राणघातक हल्ला करून हल्लेखोराची आत्महत्या
रत्नागिरी : आपल्या कार्यालयातील सहकारी महिलेवर प्राणघातक हल्ला करून त्या महिलेच्याच घरात हल्लेखोराने आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी रत्नागिरी शहरातील बंदर रोड येथे घडली.
छाया चव्हाण आणि महेश पाडावे हे दोघेही फिशरीज कॉलेजमध्ये लिपीक पदावर काम करतात. छाया चंद्रेशखर चव्हाण (वय ४०) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव असून, त्या फिशरीज कॉलेजमध्ये कामाला आहेत. त्यांच्याच कार्यालयात महेश पाडावे हा देखील काम करत आहे.
सोमवारी सकाळी त्याने छाया चव्हाण यांच्या बंदररोड येथील घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर त्याने त्यांच्याच घरात गळफास लावून आत्महत्या केली. या हल्ल्यानंतर छाया चव्हाण घराबाहेर धडपडपत आल्या असता तेथीलच एका मुलाने त्यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
या प्रकारानंतर बंदररोड परिसरात खळबळ उडाली असून, या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस करत आहेत.