क्रीडा पुरस्कारासाठी आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST2021-06-04T04:23:42+5:302021-06-04T04:23:42+5:30

भागवत यांचा सत्कार रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे स्टेट बॅंक ऑफ इंडिया देवरूख शाखेचे अधिकारी संजय भागवत सेवानिवृत्त ...

Appeal for a sports award | क्रीडा पुरस्कारासाठी आवाहन

क्रीडा पुरस्कारासाठी आवाहन

भागवत यांचा सत्कार

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे स्टेट बॅंक ऑफ इंडिया देवरूख शाखेचे अधिकारी संजय भागवत सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या पत्नी प्रा. मंजुश्री भागवत, तालुकाध्यक्ष अनंतकुमार मोघे, संजय कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य मंगेश गुरव उपस्थित होते.

काैलांचे वाटप

राजापूर : ताैक्ते वादळामुळे तालुक्यातील जैतापूर येथील दर्शना दुधवडकर यांच्या घरावर फणसाचे झाड पडून नुकसान झाले होते. खासदार विनायक राऊत यांनी आपद्ग्रस्त महिलेला स्वखर्चाने काैले उपलब्ध करून दिली आहेत. उपतालुकाप्रमुख तात्या सरवणकर यांनी विभागप्रमुख नरेश दुधवडकर यांना सोबत घेत आठशे काैले पोच केली.

हस्ताक्षर स्पर्धेत यश

लांजा : तालुक्यातील तळवडे येथील जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालयात हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत प्राथमिक गटात नयन पितळे व माध्यमिक गटात प्राची चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा इंग्रजी विभागातर्फे घेण्यात आली होती. प्राथमिक गटात दुसरा क्रमांक स्वरांगी पांचाळ, भक्ती दरडे, तर तृतीय क्रमांक आर्या पाटोळे, गाैरी शिंदे यांनी मिळविला.

ऑनलाईन परिसंवाद

रत्नागिरी : फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलाॅजीच्या इंटरनल कंप्लेंट कमिटीतर्फे ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’ विषयावर ऑनलाईन परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. सामान्य वैद्यकीय चिकीत्सक डाॅ. प्रीती मुळ्ये यांनी फिनोलेक्स ॲकॅडमीचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना या विषयावर माहिती दिली.

Web Title: Appeal for a sports award