पतीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या राग, पीडित महिलेला घरात घुसून बेदम मारहाण; मारहाणीची दापोलीत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 18:53 IST2023-03-22T18:53:12+5:302023-03-22T18:53:53+5:30

जिवे मारण्याची धमकी दिल्याने पिडित महिलेने पाेलिस स्थानकात फिर्याद दिली नसल्याची चर्चा

Angered by having an affair with her husband, the victim entered the house and beat her up in dapoli | पतीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या राग, पीडित महिलेला घरात घुसून बेदम मारहाण; मारहाणीची दापोलीत चर्चा

पतीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या राग, पीडित महिलेला घरात घुसून बेदम मारहाण; मारहाणीची दापोलीत चर्चा

दापोली : शेजारीच असणाऱ्या महिलेचे पतीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून चाैघांनी पीडित विवाहित महिला व तिच्या आईला तिच्या घरात घुसून बेदम मारहाण केली. ही घटना दापाेली शहरापासून काही अंतरावर असलेल्या एका गावात घडली. मात्र, या महिलेला जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्या महिलेने पाेलिस स्थानकात फिर्याद दिली नसल्याची चर्चा सुरू आहे.

या गावातील एका गाव पुढाऱ्याचे शेजारीच असणाऱ्या महिलेसाेबत प्रेमसंबंध असल्याचे त्या पुढाऱ्याच्या बायकाेला कळले. या रागातून त्या महिलेने पीडित महिलेच्या घरात घुसून तिला व तिच्या आईला मारहाण केली. यावेळी त्या महिलेच्या अंगावरील साेन्याचे दागिने आणि तिचा माेबाइल हिसकावून घेतल्याची चर्चा आहे. काही दिवसांनी पुन्हा त्या महिलेने धमकी दिल्याने घाबरलेल्या महिलेने पोलिस स्थानक गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेला काही दिवस झाल्याने पोलिसांनीही हात वर केल्याचे बोलले जात आहे.

या मारहाणीत पीडित महिला गंभीर जखमी झाली आहे. मात्र, तिला रुग्णालयात उपचार घेतल्यास जिवे मारू, अशीही धमकी गाव पुढाऱ्याच्या बायकाेने दिल्याचे चर्चिले जात आहे. त्यामुळे पीडित महिला उपचाराशिवाय घरातच आहे. या महिलेला काेणीही मदत न करण्याची धमकीही दिल्याची चर्चा आहे. सध्या या मारहाणीची चर्चा जाेरदार सुरू असून, मारहाणीचे नेमके कारण पुढे आले नसले तरी पतीसाेबत असलेल्या प्रेमसंबंधामुळे ही मारहाण झाल्याचे चर्चिले जात आहे.

Web Title: Angered by having an affair with her husband, the victim entered the house and beat her up in dapoli