..अन् त्यानंतर नितेश राणे पत्रकार परिषद काय असते ते महाराष्ट्राला दाखवून देतात, मंत्री उदय सामंतांनी केलं कौतुक

By मनोज मुळ्ये | Updated: May 10, 2023 13:16 IST2023-05-10T13:15:27+5:302023-05-10T13:16:18+5:30

'काहीही बोलताना आधी आपण कुठे आहोत, याचे आत्मचिंतन करणार आहोत की नाही'

..and then Nitesh Rane shows Maharashtra what a press conference is, Minister Uday Samant praised | ..अन् त्यानंतर नितेश राणे पत्रकार परिषद काय असते ते महाराष्ट्राला दाखवून देतात, मंत्री उदय सामंतांनी केलं कौतुक

..अन् त्यानंतर नितेश राणे पत्रकार परिषद काय असते ते महाराष्ट्राला दाखवून देतात, मंत्री उदय सामंतांनी केलं कौतुक

रत्नागिरी : ‘सकाळी साडेनऊ वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेला आमदार नितेश राणे दहा वाजता उत्तर देतात आणि पत्रकार परिषद काय असते, ते महाराष्ट्राला दाखवून देतात. त्यामुळे मला त्यांचे कौतुक वाटते,’ असे राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत त्यांनी आमदार राणे यांचे अभिनंदन केले. ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर नितेश राणे पत्रकार परिषद घेतात आणि उत्तर देतात. या माध्यमातून अनेक गोष्टी ते बाहेर काढतात. त्यामुळे आपल्याला त्यांचे कौतुक वाटते, असे मंत्री सामंत म्हणाले.

खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे. त्यांच्यावर काहीही बोलताना आधी आपण कुठे आहोत, याचे आत्मचिंतन करणार आहोत की नाही, असा प्रश्नही त्यांनी केला. 

Web Title: ..and then Nitesh Rane shows Maharashtra what a press conference is, Minister Uday Samant praised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.