शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीतील शिवसेनेच्या पराभवाचे विश्लेषण आवश्यक

By admin | Updated: January 1, 2015 00:16 IST

प्रसंगी बदल : दौऱ्यात कार्यकर्त्यांना सुनावले

चिपळूण : पक्ष संघटनेमध्ये काम करताना वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यापेक्षा त्यांचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे आहे. पक्षात काम करताना व्यक्तीप्रेम असायला हरकत नाही. आपल्याला आदर्श वाटणाऱ्या नेतृत्त्वाबद्दल, व्यक्तीबद्दल प्रेम असू द्या. मात्र, असे व्यक्तीप्रेम पक्षाला मारक ठरता कामा नये, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी मंडणगड दौऱ्यात बोलताना केले. जिल्ह्याच्या संपर्क दौऱ्यावर असलेल्या जिल्हाप्रमुख कदम यांनी मंडणगड तालुका कार्यकारिणीची येथील शिवसेना कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला उपजिल्हाप्रमुख राजकुमार निगुडकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख संदीप राजपुरे, महिला आघाडीच्या वैशाली चोरगे आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कदम म्हणाले, लोकसभा निवडणुकीत यश मिळाले. मात्र, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला पराभव पाहावा लागला. इथे जाती -पातीच्या राजकारणाचा फटका पक्षाला बसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला, हे दुर्दैवी आहे. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेत जाती-पातीला थारा दिला नाही. मात्र, ग्रामीण भागात विधानसभेत जाती-पातीत विषारी प्रचार झाला आणि या विषारी प्रचारातूनच पक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकीकडे जाती - पातीचे राजकारण खेळले गेले तर दुसरीकडे व्यक्तीप्रेमामुळेही नुकसान झाले. व्यक्तीप्रेम असायला हरकत नाही. मात्र, त्या प्रेमामुळे संघटनेचे हित अडचणीत येता कामा नये. कार्यकर्त्यांनी वरिष्ठांची मर्जी सांभाळताना आपण काही गमावत नाही ना? याची काळजी घ्यायला हवी, असेही जिल्हाप्रमुखांनी कार्यकर्त्यांना सांगितले. संघटनेत काम करताना शिवसैनिकांनी पक्षाशी एकनिष्ठ राहावे, जेणेकरुन भविष्यात पक्षाचे नुकसान होणार नाही. आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी झालेल्या पराभावातून बोध घ्यावा व जोमाने कामाला लागावे, असा सल्ला कदम यांनी दिला. (प्रतिनिधी)