शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

खेडमधील त्या तीनही मुली चीनमध्येच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 13:13 IST

चीनमध्ये नांतोंग विद्यापीठात वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेणाऱ्या खेड तालुक्यातील तीन विद्यार्थिनी सुरक्षित असून, त्यांना चीनच्या स्थानिक प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला असल्याची माहिती सादिया बशीर मुजावर या विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी लोकमतला दिली.

ठळक मुद्देखेडमधील त्या तीनही मुली चीनमध्येच राहणारत्या मुली पूर्ण सुरक्षित, चीनमधील कोरोना व्हायरसच्या उद्रेक

खेड : चीनमध्ये नांतोंग विद्यापीठात वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेणाऱ्या खेड तालुक्यातील तीन विद्यार्थिनी सुरक्षित असून, त्यांना चीनच्या स्थानिक प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला असल्याची माहिती सादिया बशीर मुजावर या विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी लोकमतला दिली. शिक्षणात खंड पडू नये, यासाठी या तीनही विद्यार्थिनी चीनमध्येच राहणार असल्याचे निश्चित झाले आहे.खेड शहरातील सादिया बशीर मुजावर हिच्यासह शिर्शी येथील सुमेना मुनीर हमदुले व झोया महवाश हमदुले या विद्यार्थिनी चीनमधील नांतोंग प्रातांत वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थिनींपैकी सादियाशी तिचे वडील बशीर मुजावर यांनी ३ फेब्रुवारी रोजी रात्री दूरध्वनीवर संपर्क करून संवाद साधला.सध्या या तीन मुलींच्या सुटीचा कालावधी आहे. २३ फेब्रुवारीपर्यंत सुटी आहे. चीनमधील कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे कुणालाही घराबाहेर जाण्याची परवानगी दिलेली नाही. या तीनजणी त्यामुळे घरातच आहेत. अर्थात तेथे त्या पूर्ण सुरक्षित असल्याची माहिती बशीर मुजावर यांनी दिली. स्थानिक प्रशासन त्यांची पूर्ण काळजी घेत आहे.या विद्यार्थिनींना मायदेशात जायचे असेल तर स्वत:च्या जबाबदारीवर व स्वखर्चाने परतावे लागेल, अशी सूचना करून चीनमधील स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, नांतोंग विद्यापीठ परिसरात कोणताही धोका नसल्याचा निर्वाळाही विद्यापीठ प्रशासनाने दिला. त्यामुळे सद्यस्थितीत शिक्षण अपूर्ण सोडून या विद्यार्थिनी परत येणार नसल्याची माहिती बशीर मुजावर यांनी दिली. आपण त्यांच्या नियमित संपर्कात असून, त्यांनी आपण सुरक्षित असल्याचे सांगितले आहे, असेही ते म्हणाले.योग्य व्यवस्थासादिया आणि तिच्या मैत्रिणी शाकाहारी आहेत. त्याची नोंद घेऊन त्यांना योग्य तो आहार दिला जात आहे. त्यांना कोणतीही समस्या उद्भवू नये, यासाठी स्थानिक प्रशासनासह विद्यापीठाकडूनही लक्ष दिले जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोनाRatnagiriरत्नागिरी