रत्नागिरी : जिल्ह्यातील सात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबर राेजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील २०० मतदान केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. या केंद्रांवर निवडणूक निर्णय अधिकारी १ ते ३ यांच्यासह एकूण १२०० अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.राज्यात नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठीचा पहिला टप्पा उमेदवार निश्चिती हा पार पडला असून, येत्या २ डिसेंबर रोजी यासाठी दुसरा टप्पा म्हणजे मतदान होणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड या चार नगरपरिषदा आणि गुहागर, देवरूख आणि लांजा या तीन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. सात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगराध्यक्षपदासाठी आणि १५१ नगरसेवकांच्या जागेसाठी या निवडणुका होणार आहेत. मतदानाची ही प्रक्रिया संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात पार पडणार आहे.
या प्रक्रियेची सज्जता प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या सात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी २०० मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. सर्वाधिक केंद्रे रत्नागिरीत आहेत. या प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक १ ते ३, तसेच पोलिस कर्मचारी आणि शिपाई असे प्रत्येकी २०० मिळून एकूण १००० अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्रावर कार्यरत राहणार आहेत.२०० मतदान केंद्रांसाठी एकूण कंट्रोल युनिट २२१ (राखीव १० टक्क्यांसह) आणि मतदान यंत्रे ४४१ (राखीव यंत्रांसह) सज्ज ठेवण्यात आली आहेत. या यंत्रांची उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यासमोर तपासणी झाली आहे. मतदानापूर्वीही या सर्वांच्या उपस्थितीत पडताळणी केली जाणार आहे.
न.प./न.पं. मतदान केंद्रे अधिकारी व कर्मचारी (एकूण)नगर परिषदरत्नागिरी - ६९ - ४१४चिपळूण - ४८ - २८८खेड - २० - १२०राजापूर - १० - ६०
नगरपंचायतलांजा - १९ - ११४देवरूख - १७ - १०२गुहागर - १७ - १०२एकूण - २०० - १२००
Web Summary : Ratnagiri district gears up for local body elections on December 2nd. Two hundred polling centers are ready with 1200 officials deployed for seven local bodies, including four Nagar Parishads and three Nagar Panchayats. Elections are for the Nagaradhyaksha and 151 Nagar Sevak positions.
Web Summary : रत्नागिरी जिले में 2 दिसंबर को स्थानीय निकाय चुनाव होंगे। चार नगर परिषदों और तीन नगर पंचायतों सहित सात स्थानीय निकायों के लिए दो सौ मतदान केंद्र तैयार हैं। नगराध्यक्ष और 151 नगर सेवक पदों के लिए चुनाव होंगे, जिसके लिए 1200 अधिकारियों को तैनात किया गया है।