शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

खरं स्वातंत्र्य अजून मिळवायचंय : मधुकर हिलम

By admin | Updated: September 25, 2014 23:28 IST

आदिम कातकरी संघटना : चिपळुणात नाग्या महादू कातकरी पुण्यतिथी

चिपळूण : १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, रानावनात भटकणारा कातकरी बांधव आजही विविध शासकीय सेवा सुविधांपासून वंचित आहे. या समाजाचा सर्व्हे करण्याचे काम सुरु आहे. खरं स्वातंत्र्य मिळविण्यासाठी समाजबांधवांनी संघटित व्हायला हवे असे आवाहन आदिवासी आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मधुकर हिलम यांनी येथे आज गुरुवारी केले.शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहामध्ये हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांची ८५ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास संघटनेचे उपाध्यक्ष प्रभाकर वाघे, मुख्य सचिव कमलाकर हिलम, सल्लागार शंकर वाघ, जिल्हाध्यक्ष विलास निकम, कार्याध्यक्ष सुरेश निकम, अ‍ॅड. विजय साठे, आदिवासी प्रकल्पाचे प्रतिनिधी एस.पी.चव्हाण, सचिव चंद्रकांत जाधव, शांता मुकणे, मंजुळा हिलम, शालिनी हिलम, तालुकाध्यक्ष शशिकांत हिलम, रमेश वाघ, नाना हिलम, नंदू पवार आदींसह हजारो कातकरी समाजबांधव उपस्थित होते. कातकरी समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालेच पाहिजे. यासाठी पालकांनी त्यांना शाळेत जाण्याचा आग्रह धरला पाहिजे. आश्रम शाळेत मुलांना शिक्षणासाठी पाठविले पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळूनही हा समाज शासकीय सेवा सुविधांपासून वंचित जीवन जगत आहे. प्रत्येक वाडीवस्तीवर रस्ता व्हायला हवा. समाज मंदिरही उभी राहिली पाहिजेत. या समाजाचा सर्व्हे करण्यात न आल्यामुळे शासनाकडे निधी असूनही तो खर्च केला जात नाही. यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरु आहे. स्वातंत्र्याची खरी लढाई आपल्याला जिंंकायची आहे असेही हिलम यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मोहिते यांनी केले. (वार्ताहर)