रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर अपघात; पत्नी ठार पती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 15:01 IST2018-03-04T09:54:15+5:302018-03-04T15:01:16+5:30

रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर साखरपा (ता. संगमेश्वर) येथे आज रविवारी पहाटे झालेल्या अपघातात...

Accidents on Ratnagiri-Kolhapur highway; Wife killed wife seriously | रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर अपघात; पत्नी ठार पती गंभीर

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर अपघात; पत्नी ठार पती गंभीर

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर साखरपा (ता. संगमेश्वर) येथे आज रविवारी पहाटे झालेल्या कार अपघातात पद्मा मांगले (४२) ही महिला जागीच ठार झाली तर त्यांचा पती महेश मांगले (४६) गंभीर जखमी झाले. हे दांपत्य कोल्हापूरहून अगरबत्ती खरेदी करुन देवरुखला जात होती.
महेश मांगले यांचा देवरुख येथे अगरबत्तीचा व्यवसाय आहे. शनिवारी ते पत्नीसह कोल्हापूरला गेले होते. रात्री ११.३० वाजता तेथून निघाले. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास साखरपा जाधववाडी येथे एका वळणावर त्यांची नॕनो कार मोरीवरील पुलावरुन खाली कोसळली. त्यात पद्मा मांगले या जागीच ठार झाल्या. महेश मांगले गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रत्नागिरीला हलवण्यात आले आहे. पद्मा मांगले या संगमेश्वर तालुक्यातील सायले प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या.

Web Title: Accidents on Ratnagiri-Kolhapur highway; Wife killed wife seriously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.