अचानक गाडी बंद पडली अन् मागून बसने दिली धडक, वैजीतील तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 19:13 IST2022-04-01T19:12:35+5:302022-04-01T19:13:09+5:30

चिपळूण : त्याची घरी परतण्याची वेळ झाली होती. तो गाडीवरून निघाला; पण अचानक त्याची गाडी बंद पडली आणि मागून ...

A youth from Chiplun taluka died in a bus collision | अचानक गाडी बंद पडली अन् मागून बसने दिली धडक, वैजीतील तरुणाचा मृत्यू

अचानक गाडी बंद पडली अन् मागून बसने दिली धडक, वैजीतील तरुणाचा मृत्यू

चिपळूण : त्याची घरी परतण्याची वेळ झाली होती. तो गाडीवरून निघाला; पण अचानक त्याची गाडी बंद पडली आणि मागून आलेल्या एका कंपनीच्या बसने त्याला धडक दिली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. शहरातील मार्कंडी येथे गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या या तरुणाचे नाव सूरज मोरे (२५, वैजी, ता. चिपळूण) असे आहे.

तालुक्यातील वैजी येथील रहिवासी व शहरातील साऊंड ऑफ म्युझिकमध्ये कामाला असलेला सूरज गुरुवारी काम आटोपून दुचाकीवरून घरी जाण्यासाठी निघाला. मार्कंडी येथे रात्री साडेआठ वाजता त्याची दुचाकी अचानक बंद पडली आणि त्याचवेळी मागून येणाऱ्या एका कंपनीच्या बसने त्याला धडक दिली. यामध्ये सूरज बसच्या मागील चाकाखाली सापडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

या विचित्र अपघातानंतर येथे मोठी गर्दी झाली होती. त्यांचा मृतदेह रात्री कामथे रुग्णालयात विच्छेदनासाठी नेण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी वैजी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सूरज मेकॅनिकल इंजिनिअर होता. तो गेली काही वर्षे साऊंड ऑफ म्युझिकमध्ये एसी, कुलर, फ्रीज दुरुस्तीची सेवा देत होता. सूरजच्या या अपघाती मृत्यूमुळे वैजी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, असा परिवार आहे.

Web Title: A youth from Chiplun taluka died in a bus collision