Ratnagiri: परीक्षेत कमी गुण पडले, विषारी औषध पिलेल्या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 18:25 IST2025-12-16T18:22:27+5:302025-12-16T18:25:52+5:30
काेल्हापुरातील रुग्णालयात सुरू हाेते उपचार

Ratnagiri: परीक्षेत कमी गुण पडले, विषारी औषध पिलेल्या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू
राजापूर : बारावीच्या परीक्षेत कमी गुण पडल्याने विषारी औषध प्राशन केलेल्या १७ वर्षीय युवतीचा काेल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा प्रकार राजापूर तालुक्यातील एका गावात ३० नाेव्हेंबर राेजी घडला आहे.
याबाबत पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील बारावीत शिकणाऱ्या युवतीला बारावीच्या परीक्षेत अकाउंट व इंग्रजी विषयामध्ये कमी गुण पडले. त्यामुळे ती नापास झाल्याने तणावाखाली हाेती. त्याच तणावाखाली ती घरी आली आणि तिने घरातील फवारणीचे औषध घेतले.
ही गाेष्ट तिच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तिला तातडीने लांजा येथील रुग्णालयात दाखल केले हाेते. त्यानंतर अधिक उपचारांसाठी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले हाेते. तिथून काेल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार सुरू हाेते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.