धक्कादायक! जेवण आवडले नाही म्हणून नातेवाईकांशी घातला वाद, अन् रागाच्या भरात तरुणीने घेतला गळफास

By अरुण आडिवरेकर | Updated: December 1, 2022 18:34 IST2022-12-01T18:33:22+5:302022-12-01T18:34:00+5:30

शहर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद

A young woman committed suicide in Ratnagiri because the food was not good | धक्कादायक! जेवण आवडले नाही म्हणून नातेवाईकांशी घातला वाद, अन् रागाच्या भरात तरुणीने घेतला गळफास

संग्रहित फोटो

रत्नागिरी : जेवण चांगले झाले नाही यावरून नातेवाईकांशी वाद घालत तरुणीने बेडरूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना काल, बुधवारी (३० नोव्हेंबर) नाचणे परिसरातील सौभाग्य नगर येथे घडली.

रत्नागिरी शहरातील नाचणे येथील सौभाग्य नगर येथील स्वरूप अपार्टमेंट येथे ही तरुणी वास्तव्याला होती. काल, बुधवारी दुपारी घरात जेवण करण्यात आले होते. मात्र, हे जेवण तरुणीला पसंत पडले नाही. त्यावरुन तिने नातेवाईकांशी वाद घातला. या वादाच्या भरात तिने घरातील बेडरूममध्ये जाऊन फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव समोर आलेले नाही. मुलीच्या आईने शहर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली. शहर पोलिसांकडून स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: A young woman committed suicide in Ratnagiri because the food was not good