शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
3
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकली; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
4
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
5
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
6
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
7
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
8
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
9
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
10
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
11
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
12
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
13
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
14
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
15
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
16
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
17
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
18
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
19
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
20
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीपुळे समुद्रात बुडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू, दोघांना वाचविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 15:36 IST

पोलिसांच्या गस्तीत वाढ

गणपतीपुळे : समुद्राच्या पाण्यात आंघोळीचा आनंद लुटताना पाण्याचा अंदाज न आल्याने मुंबईतील तीन तरुण बुडाल्याची घटना शनिवारी (१५ नाेव्हेंबर) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमाराला गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथे घडली. यातील दाेघांना वाचविण्यात यश आले असून, एकाचा बुडून मृत्यू झाला. अमाेल गाेविंद ठाकरे (वय २५, रा. भिवंडी, मुंबई) असे या तरुणाचे नाव असून, पर्यटक निवासासमोरील समुद्रकिनारी रविवारी पहाटे ताे सापडला.भिवंडी येथून सहा मित्र गणपतीपुळे येथे देवदर्शन आणि पर्यटनासाठी शनिवारी आले हाेते. त्यापैकी अमाेल ठाकरे, विकास विजयपाल शर्मा (वय २४), मंदार दीपक पाटील (वय २४) हे तिघे समुद्राच्या पाण्यात आंघोळीसाठी गेले हाेते. तिघांनीही समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेही बुडू लागले.हा प्रकार त्यांच्यासोबत किनाऱ्यावर असलेल्या अन्य मित्रांनी पाहिला आणि त्यांनी आरडाओरडा करून मदत मागितली. मोरया वॉटर स्पोर्टच्या जेटस्की बोटीवरील व्यावसायिकांनी तत्काळ धाव घेत मदत केली. यातील दोघांना पाण्याबाहेर काढण्यात त्यांना यश आले. मात्र, अमाेल ठाकरे हा पाण्यात बेपत्ता झाला.

पाण्यातून बाहेर काढलेल्या तातडीने विकास विजयपाल शर्मा आणि मंदार पाटील या दोघांना संस्थान श्रीदेव गणपतीपुळेच्या रुग्णवाहिकेने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.दरम्यान, शनिवारी सायंकाळी बुडालेल्या अमाेल ठाकरे याचा रात्रभर समुद्राच्या पाण्यात शाेध सुरु हाेता. पर्यटक निवासासमोरील समुद्रकिनारी भागात रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ताे बेशुद्धावस्थेत सापडला. त्याला तातडीने वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले हाेते. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची कदम यांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून मृत घोषित केले. त्यानंतर उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.पाेलिसांच्या गस्तीत वाढगणपतीपुळे येथे शनिवार, रविवारी पर्यटकांची माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत आहे. मात्र, यातील अतिउत्साही पर्यटक समुद्रस्नानाचा आनंद लुटण्यासाठी समुद्रात जात आहेत. मात्र, पाण्याचा अंदाज येत नसल्याने पर्यटक बुडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर याठिकाणी पाेलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Youth Drowns in Ganpatipule Sea; Two Rescued

Web Summary : A Mumbai youth drowned at Ganpatipule while swimming. Two others were rescued by Moraya Water Sports. Amol Thakare's body was found the next day. Police have increased patrols due to increased tourist activity.