शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीची लगबग, रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत किती हेक्टर क्षेत्रावर झाली पेरणी.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:33 IST

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसाने मे महिन्यातच हजेरी लावली. सलग दहा दिवस जिल्ह्यात संततधार पर्जन्यवृष्टी झाली; परंतु त्या काळात पेरणी ...

रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसाने मे महिन्यातच हजेरी लावली. सलग दहा दिवस जिल्ह्यात संततधार पर्जन्यवृष्टी झाली; परंतु त्या काळात पेरणी करणे अशक्य व धोकादायक होते. त्यामुळे पाऊस थांबताच शेतकऱ्यांनी पेरण्यांच्या कामाला प्रारंभ केला. जिल्ह्याचे मुख्य पीक भात, तर दुय्यम पीक नागली असून, जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी रोपे काढून लागवड पद्धत अवलंबली जाते. जिल्ह्यात एकूण ७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जात असून, आतापर्यंत एकूण २,५४१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.मृग नक्षत्र सुरू झाले असून, सलग पाऊस नसला तरी बऱ्यापैकी उघडझाप सुरू आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा पाहून शेतकरी भात, नाचणीची पेरणी करीत आहेत. जिल्ह्यात ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर भात, तर १० हजार हेक्टर क्षेत्रावर नाचणीची लागवड केली जाते; मात्र तत्पूर्वी लागवडीसाठी रोपे काढण्यासाठी पेरणी केली जाते.सध्या जिल्ह्यात पेरणीची कामे सुरू आहेत. पारंपरिक नांगर; तसेच पाॅवर टिलरच्या साहाय्याने नांगरणी केली जात आहे; मात्र पाणथळ जमिनीत नांगरणी न करता कुदळीचा वापर करून खणून पेरणी करण्यात येत आहे. पेरणीनंतर २० ते २१ दिवसांनी रोपे काढून लागवड केली जाते. त्यासाठी लागवड केलेल्या क्षेत्राची नांगरणी करून चिखल केला जातो.खरीप हंगामात जिल्ह्यात पावसाच्या पाण्यावर लागवड केली जात असल्यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांना रोपांची उगवण व योग्य पद्धतीने वाढ महत्त्वपूर्ण आहे. पेरणी पूर्ण झालेले शेतकरी लागवड केलेल्या क्षेत्रात पाणी साचून राहावे, तण उगवू नये, यासाठी नांगरणी करून ठेवत आहेत.तालुकानिहाय पेरणी क्षेत्रतालुका - पेरणी क्षेत्र

  • मंडणगड - १६५.२
  • दापोली - ४६२.२
  • खेड - २७३.२
  • चिपळूण - ४४४.७१
  • गुहागर - १११.२३
  • संगमेश्वर  -३५४.२
  • रत्नागिरी - २१०.६२
  • लांजा  -२४२.२
  • राजापूर  -२७८.२
  • एकूण  -२५४१.७६